पाणी वितरणाची वेळ बदलण्याची नागरिकांची मागणी

राहाता प्रतिनिधी, दि. १४ :  शहरातील गावठाण परिसरात पिण्याचे पाणी वितरण पहाटे ४ वाजे पासून सुरू होत असल्याने नागरिकांना ऐन थंडीत पिण्याच्या पाण्यासाठी पहाटे उठावे लागत असल्याने नागरिकांची झोप होत नाही नगरपरिषदेने पिण्याचे पाणी वितरण सकाळी ६ वाजेनंतर सुरू करावे अशी मागणी विधिज्ञ प्रवीण गांधी यांनी नागरिकांच्या वतीने केली आहे. 

  याबाबत बोलताना विधिज्ञ गांधी म्हणाले कि, राहाता शहरात गावठाण परिसरात नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा  विभागाकडून पिण्याचे पाणी वितरण पहाटे ४ वाजेपासून सुरू करण्यात येते  त्यामुळे नागरिकांना पहाटे ३ वाजेपासूनच पिण्याचे पाणी येण्याची वाट पाहावी लागते. परिणामी नागरिकांची झोप होत नाही. संध्या हिवाळा ऋतू सुरू असल्याने पहाटे थंडीमुळे नागरिकांना पिण्याचे पाणी साठवण करण्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

पाणी वितरण करण्याची वेळ ही पहाटची असल्यामुळे नागरिकांची पुरेशी झोप होत नाही. प्रामुख्याने महिलांना या गोष्टीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाने गावठाण हद्द परिसरात पहाटे ६ वाजेनंतर पिण्याचे पाणी वितरण करावे अशी मागणी विधिज्ञ प्रवीण गांधी यांनी नागरिकांच्या वतीने केली आहे.

पाणी वितरण हे पहाटे ४ वाजे पासून सुरू केल्यानंतरच ते सकाळी १२ वाजेपर्यंत पूर्ण होते. उशिरा केले तर दुपारी एक किंवा दोन वाजेपर्यंत वितरण करण्यासाठी वेळ लागेल. तरीदेखील नागरिकांच्या मागणीचा विचार करून पिण्याचे पाणी वितरण करण्याची वेळ सकाळी ६ वाजेपासून सुरू करण्यासाठी  नियोजन करू – मुख्याधिकारी वैभव लोंढे

Leave a Reply