कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : कोपरगाव येथील गोदावरी खोरे नामदेवराजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाला ४९ वर्षें पुर्ण होवून सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्याने या संघाने शेतकरी दूध उत्पादकांच्या हितासाठी नव्या आधुनिक विविध प्रकल्पांचा शुभारंभ २० जानेवारी सोमवारी सकाळी १० वा. संघाच्या कार्यस्थळावर होणार असल्याची माहिती संघाचे चेअरमन राजेश परजणे यांनी सांगितले.
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यस्थळावर पञकार परिषदेचे आयोजन करून संघाचे चेअरमन राजेश परजणे यांनी माहीती दिली. ते पुढे म्हणाले की, दूध धंद्यातील वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी व दूध उत्पादक तसेच शेतकरी, विक्रेते, ग्राहकांच्या हितासाठी गोदावरी दूध संघाने अनेक आधुनिक तंञज्ञान विकसित करुन सहकारी दूध संघात नवी क्रांती केली आहे.
दूध संघाच्या खर्चात बचत करण्यासाठी विज निर्मीतीचं पाऊल उचलुन तब्बल ५० टक्के विज बिल वाचवण्यात आले असुन दिड मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभा केला आहे. सुक्षम निर्जंतुकीकरण करुन ग्राहकांना अधीक दर्जेदार दूध देण्यासाठी नव्या मिल्क क्लोरिफायर मशिन बसवण्यात आले आहे. जून्या पध्दतीने चुलीवर कढईत खवा बनवण्याच्या पध्दतीला पुर्णविराम देत खव्याच्या दर्जामध्ये अधिक सकसपणा यावा.
तसेच कमी वेळेत योग्या पध्दतीने एकसारखा खवा तयार व्हावा म्हणुन संघाने कन्ट्यूअस खवा मेकींगची आधुनिक मशिन बसवली असुन अवघ्या तासात खवा बनवला जाणार आहे. तसेच नव्या पध्दतीचे जलशुद्धीकरण व पाणी स ठेवण्याचे टॅंक बसवून संघाची संपूर्ण दूध प्रकल्पाची प्रक्रिया आधुनिक केली आहे. सहकारी क्षेञाली गोदावरी दूध संघ हा एकमेक दूध संघ आहे की, तो आधुनिकरणात अव्वल आहे.
या नव्या सर्व विविध प्रकल्पांचा शुभारंभ तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी कर्मचारी वसाहतीचा शुभारंभ राज्यस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे चेअरमन दिनेश शाह, आमदार रमेश बोरणारे, आमदार आशुतोष काळे,आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठल लंघे,आमदार काशिनाथ दाते व गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे अशी माहीत परजणे यांनी दिली.
गोदावरी दूध संघाने अमुलाग्र बदल करुन राज्यातील दूध संघापुढे आधूनिकतेचा नवा आदर्श निर्माण केल्याने गोदावरी दूध संघ नव्या जोमाने नवी स्वप्ने साकार करण्यासाठी दमदार पावलं टाकीत आहे.