चायना मांज्यात अडकलेल्या कावळ्याला सर्पमित्रांमुळे जीवदान

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : तालुक्यातील कोळपेवाडी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात असलेल्या उंच पिंपळाच्या फांदीवर चायना मांजात अडकलेल्या कावळ्यास सर्पमित्र रमेश भोंगळ यांच्यामुळे जिवदान मिळाल्याने त्याचे वन्यजीव प्राणी मित्रांकडून कौतुक होत आहे.

 कोळपेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात अर्ध शतका पेक्षा जास्त वयाच्या ८० फुट उंच असणाऱ्या पिंपळाच्या झाडावर चायना माज्यांत कावळा अडकला असल्याची माहिती सर्पमित्र रमेश भोंगळ यांना मिळाली असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत झाडाचे निरिक्षण केले असता चायना माज्यांत कावळ्याचे पंख अडल्याने त्यातून सुटण्यासाठी जिवाच्या आंकताने होणारी धडपड हि बुधवार सांयकाळा पासून असल्याने कावळ्याचा काव- काव आवाजही क्षिण झालेला होता. त्याची धडपड हि इतर कावळ्याना स्वस्थ बसू देत नसल्याने त्यांनी काव काव करत परिसर दणाणून सोडला होता.

इतक्या उंच फांदीवर अडकलेल्या कावळ्याला कुठलिही ईजा होवू न देता सुरक्षित माज्यांतुन बाहेर काढायचे कसे असा प्रश्न भोंगळ यांच्या समोर असल्याने त्यांनी गावातील तरुण मेंढपाळ अमोल कोळपे यांची आठवन झाली. अमोल यांना शेळ्याच्या चाऱ्यासाठी कायमच उंच झाडावर चढण्याचा सराव असल्याने त्यांनी कुऱ्हाड पाठिला अडकून अवघड अशा फांदीवर चढण्याचे धाडस करत मोठ्या मुश्किलीने कावळा अडकलेल्या ठिकाणी जात अलगद छोटी फांदी तोडून चायना माज्यांत अडकलेल्या कावळ्यास मुक्त करताच मुंत्युच्या दाढेतून कुठलाही अवयव जखमी न होता त्याने उंच अवकाशात भरारी घेत शेजारील लिबांच्या झाडावर बसलेल्या आप्त स्वकियांना भेटुन त्यांनी काव – काव करत केलेला आंनदोत्सव अमोलचे आभार मानत होता.

 चायना माज्याच्या वापरास शासनाकडून बंदी असतांना मकरसंक्रांतीच्या सणाला पंतग प्रेमी कडुन माज्यांचा झालेला वापर कायद्याच्या दुर्लक्षा चे परिणाम पशु पक्षा बरोबर मानवाला भोगावे लागत असल्याची खंत भोंगळ यांनी बोलुन दाखवली.