पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व संदीप कोळींनी रॅलीचे नेतृत्व केले
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८: पोलीसांच्या दोन, चारचाकी गाड्यांच्या सायरन्सचा आवाज एक गाडी पुढे एक गाडी मागे. दोन्ही गाड्यांच्या मध्ये पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे डोक्याला हेल्मेट घालुन बुलेटवर आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह सर्वजण बुलेटला तिरंगा लावून शिस्तबद्ध रॅली काढली. अचानक पोलीसांची हि अभिनव रॅली पाहुन अनेकांना आश्चर्य वाटले.

या बाबतची पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कोपरगाव तालुक्यासह शहरातील नागरीकांना नवीन कायद्याची माहीती समजावी. त्या नव्याने अमलात आलेल्या कायद्याची जनजागृती करण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी २६ जानेवारीच्या दिवशी कोपरगाव तहसील कार्यालय येथून शहरात पोलीसांच्या बुलेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

तहसीलदार महेश सावंत व कोपरगाव नगरपालीकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप तालुका कृषि अधिकारी मनोज सोनवणे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॉलीचा शुभारंभ केला. शहरातील तहसील मैदानापासून हि रॅली टिळकनगर, गांधीनगर, छञपती संभाजी महाराज पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लोकशाही आण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे निवारा रोड, गोकुळनगरी मार्गे तहसील मैदान ते पोलीस स्टेशन येथे येवून विसर्जीत करण्यात आली.

एकाचवेळी अनेक पोलीस एकञ येवून शहरातून बुलेटवर शिस्तबद्ध रॅली काढली त्यांच्या हातात नव्या कायद्याचे नवे संदेश होते. गाडी चालवताना हेल्मेट असले पाहीजेत. केवळ कायद्याचा धाक म्हणून हेल्मेट नसावा तर आपल्या सुरक्षेसाठी असावा. कायद्याची जनजागृती झाली पाहीजे. प्रजासत्ताक दिनी प्रजेची सत्ता असलेले हे राज्य आहे घटनेवर चालते त्या घटनेतील नवीन अमलात आलेल्या कायद्याची माहीती नागरीकां व्हावी म्हणून या अभिनव रॅलीचे आयोजन केल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली.

आजपर्यंत शहरात अनेक रॅल्या निघाल्या. हातात वेगवेगळ्या पार्ट्यांचे झेंडे घेतलेले कार्यकर्ते कर्कश्श आवाजाने लक्षवेधीत फिरले पण पोलीसांनी काढलेली हि रॅली दोन रेषेत कोणत्याही घोषणा न देता हातात तिरंगा घेवुन देशाभिमानी मशाल नागरीकांच्या मनात पेटवत शिस्तीचे धडे देत होती. शहरातील या बुलेट रॅलीने प्रजासत्ताक दिन अधिक उत्साहाने बहरला.
