शासन हमीभाव दराने सोयाबीन खरेदीची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा – सभापती रोहोम

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १३ : शासनाने सन 2024-25 करिता सोयाबीन या शेतीमालाचा आधारभुत दर रूपये 4,892/- जाहिर केला असुन कोपरगांव तालुक्यातील शेतक-यांसाठी कृषि उत्पन्ऩ बाजार समिती कोपरगांवच्या मुख्य़ मार्केट यार्ड या ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रावर शासनाच्या सन 2024-25 या वर्षाकरिता आधारभुत दर रूपये 4,892/- या प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी केली आहे. सध्या सोयाबीनचे भाव पडलेले असल्याने सोयाबीन उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कृषि उत्पन्ऩ बाजार समिती कोपरगांवच्या सोयाबीन खरेदी केंद्रावरील 556 शेतकऱ्यानी 8590 क्विंटल (17180 गोणी)  सोयाबीन शेतमाल विक्री केलेला असुन त्यापैकी 305 शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या 4,797 क्विंटलचे पेमेंट 4892/- दराने रुपये 2,34,66,924/- शेतकरी वर्गाच्या बँक खात्यावर जमा झाल्याची माहिती सभापती साहेबराव रोहोम व उपसभापती गोवर्धन परजणे यांनी दिली आहे.

कृषि उत्पन्ऩ बाजार समिती कोपरगांवच्या मुख्य़ मार्केट यार्ड या ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या उर्वरित शेतकरी वर्गाची 3,793 क्विंटल सोयाबीन खरेदीची रक्क़म रूपये 1,85,55,356/- सात दिवसात शेतकरी वर्गाच्या बँक खात्यावर वर्ग होईल अशी माहिती बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांनी दिली आहे.

Leave a Reply