कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : मतदारसंघात सध्या रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांमुळे आणि बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त आहेत. एकीकडे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून जीविताचे रक्षण करायचे आणि दुसरीकडे खराब रस्त्यांमुळे अनेकांचे जीवन संकटात आहे अशी द्विधा संकट परिस्थिती आहे. या संकटात बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात कधी आई मुलाला वाचवते, कधी आजोबा नातवाला वाचवतात तर कधी मुलगा आईला वाचवतो अशा अनेक घटना नजिकच्या काळात घडल्या आहे. ऊस तोडणी सर्वत्र आता सुरू झाली आहे त्यामुळे क्षेत्र रिकामे झाल्यानंतर या बिबट्यांचा वावर नागरी वस्तीत वाढेल.लहान मुले,महिला यांना अनेकदा या प्रकाराच्या हल्ल्यामुळे आपले प्राण संकटात टाकावे लागता आहेत.ऊसतोडणी मजूर देखील संकटात काम करणार आहे त्यामुळे वेळीच यावर कार्यवाही करून उपायोजना करावी अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.

दुसरीकडे रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट असून नुकताच एका युवकाचा दुर्दैवी अपघात नगर मनमाड महामार्गावर कोपरगाव हद्दीत झाला. एक गृहस्थांना हृदयविकाराचा त्रास झाला त्यांना वाहनात टाकून दवाखान्यात नेण्यासाठी केवळ रस्ता खराब असल्याने उशीर झाल्याने दुर्देवाने मृत्यूशी झुंज अपयशी झाली. अशा अनेक घटना आहेत त्यामुळे रस्त्यांच्या अवस्थेची समस्या नागरिकांन दैनंदिन भेडसावत आहे अशी भावना कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.


