आम्हाला शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही – आमदार काळे 

शक्ती प्रदर्शन न करता  काका कोयटेंनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरला

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कोपरगाव नगरपालीकेच्या निवडणुकीत काका कोयटे यांच्या उमेदवारीने राजकीय समिकरण बदले, अशातच आमदार आशुतोष काळे यांनी कसलाही गाजावाजा अथवा कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे यांचा उमेदवारी स्वत:च्या साक्षीने भरला. यावेळी कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, महानंद दूध संघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे, शहर अध्यक्ष सुनिल गंगुले आदींची उपस्थिती होती.

यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, विरोधकांनी कितीही शक्ती प्रदर्शन केले तरी आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याची आत्ता तरी गरज नाही. आज फक्त उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलो होतो. गरज पडली तर नक्कीच शक्ती प्रदर्शन करू जनता मतपेटीतून आम्हाला निवडून देणार आहे असा विश्वास व्यक्त करीत आमदार काळेंनी विरोधकांवर कमी शब्दात मोठा निशाणा साधला. 

 यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे म्हणाले की, आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज वाटत नाही करण जनता मतदानातून आमची शक्ती दाखवणार आहे. मी कोपरगावकरांचा लाडका काका आहे. मी बाहेरचा उमेदवार नसुन पराग संधान हेच नाशिक जिल्ह्यातील  बाहेरचे पार्सल आहे.  कोल्हेंच्या घरातले ते उमेदवार आहेत. ते कोल्हेंसाठी काय काय करतात हे मला सांगायची गरज नाही.

तेव्हा माझ्या समोर कोणीही उमेदवार असले तरीही विजय आमचाच आहे. कोपरगावच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार आशुतोष काळे यांनी मला उमेदवारी दिली आहे. आमदार काळे यांनी शहरात केलेल्या विकासावर मला सर्वाधिक मताधिक्य मिळणार असल्याची खात्री कोयटे यांनी व्यक्त केली. 

Leave a Reply