मुख्यमंत्री, पालकमंत्री व जलसंपदा मंत्री कोल्हेंच्या पाठीमागे खंबीर
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : कोपरगावकरांनो मागच्या विधानसभा निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या काही मतांनी घालवलं. मागच्या नगरपालिका निवडणुकीत भाजपचं पॅनल निवडून दिलात पण नगराध्यक्ष निवडून दिले नाही. अशा गोष्टी पुन्हा करू नका. आता नगराध्यक्ष पराग संधानसह संपूर्ण पॅनल आपलच निवडून द्या आता थोडक्यात चुका करू नका. कोपरगावमध्ये आपला दणदणीत विजय झाला तर विजयी सभेसाठी मी पुन्हा येईन असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव येथील प्रचार सभेत व्यक्त केली. कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीत

भारतीय जनता पार्टी,आरपीआय,मिञ पक्ष व लोकसेवा आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार नारळाच्या आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, आमदार विक्रम पाचपुते, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान, रेणुका कोल्हे, रविंद्र बोरावके, माजी नगराध्यक्ष रविंद्र पाठक, राजेंद्र सोनवणे व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सोमवारी राञी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रचार सभा व नारळाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी नागरीकांच्या गर्दीचा उच्चांक झाला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून प्रचार शुभारंभ केला तसेच उपस्थित प्रमुखांच्या हस्ते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून कोपरगावच्या विकासाचा आराखडा मांडणारा विश्वासनामाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मी कोपरगावच्या विकासासाठी कोल्हेंनी अनेक प्रकारची मागणी केली आहे ती पुर्ण करण्याची जबाबदारी माझी आहेच पणहमतदारांची एक जबाबदारी आहे. कोपरगावला विकास निधीत मी कमी पडू देणार नाही पण त्या आलेला निधी जनतेपर्यंत पोहचला पाहीजे. जर तुमच्यापर्यंत पोहचवायचा असेल तर एक पारदर्शक विकासाची दृष्टी असेला पराग संधान सारखा नगराध्यक्ष तिथे असला पाहीजे.

केंद्र व राज्य सरकार कडून शहराच्या विविध विकासासाठी देशातील अनेक शहरांना ५० हजार कोटींचा निधी देणार आहे. तेव्हा कोपरगावसाठी विवेक कोल्हे व स्नेहलता कोल्हे यांनी जो विश्वासनामा तयार केला आहे तो पुर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील अनेक अतिक्रमाणे नियमित करण्यासाठी पाठपुरावा केला आहे ते सर्व अतिक्रमण धारकांचे अतिक्रमणे नियमित करुन त्यांना आडीज लाखाचे अर्थसाहाय्य देवून पक्के घरे बांधून देणार आहे. कोणालाही बेघर होवू देणार नाही.

तालुक्यातील धोञे येथील समृध्दी महामार्गावर स्मार्ट सिटी लवकरच पुर्ण करून तालुक्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे सांगितले. आता कोल्हे यांच्या साथीला मी तर आहेच पण पालकमंत्री राधाकृष्ण विखे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा आहे तेव्हा भाजपला निवडून देणं ही तुमची जबाबदारी आहे.पाच वर्ष विकासासाठी मदत करणे आमची जबाबदारी आहे असे म्हणत कोल्हे परिवाराच्या कार्याचे कौतून करुन संधान यांना निवडून देण्याचे आवहान फडणवीस यांनी केले. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील ही पहीलीच प्रचार सभा आहे.

कोपरगावच्या राजकारणामध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार फक्त पराग संधानच आहेत. मामावर बोलण्याचा अधिकार भाचीला आहे. तेव्हा भाचीने मनात शंका ठेवू नये. निवडणूक आपण जिंकणार आहोत. संधानच नगराध्यक्ष पदी निवडून येणार असा विश्वास विखेनी व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे जिल्ह्यातील सिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.

यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे बोलताना म्हणाल्या की, देवाभाऊसह पालकमंत्री विखे आल्याचा विशेष आनंद झाला. कोपरगावच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भरभरून निधी दिल्यामुळे विकास होतोय. कोपरगावकरांच्या अनेक संकटाला धावणारा संजीवनी उद्योग समुह आहे असे म्हणत सध्याच्या परिस्थितीवर व समस्यांचा पाढा वाचत विरोधकांवर निशाणा साधला. तसेच पालकमंत्री साहेब तुम्ही कोणालाही पाठीशी घालु नका. अमित शहा आले तेव्हा लोणीच्या कार्यक्रमापेक्षा संजीवनीचा कार्यक्रम चांगला झाला म्हणत विवेक कोल्हे यांच कौतूक करून तुमच्या बद्द्ल काहीही सांगणारे तेच आज विरोधी उमेदवार आहेत अशी आठवण विखेंना करून दिली.

यावेळी विवेक कोल्हे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे आपल्यावर किती प्रेम आहे हे या कार्यक्रमावरून समजते. जिल्ह्यात एकमेव सभा कोपरगावला झाली त्यामुळे झालेली हि गर्दी म्हणजेच भाजप व मिञ पक्षाची विजयी सभा झाली असे समजतो. तालुक्यातील पाणी प्रश्नासह कोपरगा विकासाच्या अनेक समस्याचे निवारण करुन नव्या संकल्पना मांडत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे विवेक कोल्हेंनी अनेक मतदार संघाच्या विकासासाठी मदत करण्याची विनंती केली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने काळे कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय जगताप, मनसेचे उपजिल्हाप्रमुख संतोष गंगवाल, माजी नगरसेवक संतोष चवंडके, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार पोटे, व्यापारी संघटनेचे संस्थापक व शिवसेनेचे अंकुश वाघ, रावसाहेब साठे, कैलास मंजुळ, संतोष शेजवळ, रोशन शेजवळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते हाती भाजपचे कमळ घेवून आमदार काळेंना व आपल्या पक्षाला जय महाराष्ट्र केला. या वेळी संतोष गंगवाल, जितेंद्र रणशुर, रविंद्र बोरावके, केशवराव भवर, दिलीप दारुणकर आदींनी आपल्या भाषणातून विरोधकावर टिका करत भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रा. साहेबराव दवंगे व किरण ठाकरे यांनी केले.

शहराची ओळख धुळगाव झाली. ती पुसण्यासाठी प्रयत्न करणार असून आम्ही कोणाच्या विरोधात लढत नाही तर जनतेच्या सेवेसाठी लढतोय. – पराग संधान

