कोपरगाव विकासाच्या नव्या उंबरठ्यावर – अजित पवार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : आधुनिक महाराष्टाची भाग्यरेषा म्हणून ओळखलेल्या समृध्दी महामार्गाजवळच कोपरगाव शहर असुन महामार्गा, रस्ते, रेल्वे व हवाई या तिन्ही माध्यमांतून सर्वोत्तम संपर्काचं बलस्थान कोपरगाव आहे. याच बलस्थानाच्या जोरावर विकासाला गती देण्याचे नवं इंजिन सर्वांनी  मिळून पुढे न्यायचे आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव आधुनिकतेकडे वाटचाल करीत असुन नव्या विकासाच्या उंबरठ्यावर असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरगाव येथे केले. 

कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व मिञ पक्षांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे व सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कोपरगाव येथील आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते. यावेळी आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे, चैताली काळे, माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे, पद्माकांत कुदळे, कृष्णा आढाव, संदीप कोयटे, कपिल पवार,चारूदत्त सिनगर, धरमचंद बागरेचा, प्रविण शिंदे सुनिल गंगुले, यांच्यासह पार्टीचे  नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर झालेल्या या सभेला प्रचंड गर्दी होती.

यावेळी बोलताना अजित पवार पुढे म्हणाले की, कोपरगाव शहराला हजारो वर्षाचा ऐतिहासिक, पौराणिक वारसा लाभलेल शहर असुन रामायण, महाभारत काळातील परंपरेचं थेट नातं सांगणारं पुण्यस्थान विस्तिर्ण गोदाकाठच्या समृद्ध, संस्कृती व संत विचारांचा आध्यात्मिक वारसा आहे. ‌शतकापुर्वीची  बाजारपेठ व कौशल्य संपन्न युवा पिढी ही कोपरगावची खरी शक्ती आहे. आपली परंपरा जपत आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे. कोपरगावच्या विकासासाठी मी कधीच पडणार नाही. मी शब्दाचा पक्का आणि कामाचा माणुस आहे.

कोपरगावच्या विकासाचे स्वप्न काळे यांच्या मनी आहे ते सत्यात उतरवून कोपरगावच्या सौंदर्यात भर पाडायचे आहे. विकास कामासाठी आशुतोष काळे सतत प्रयत्नशील असतात कोपरगाव शहर हे विकासाच्या माध्यमातून राज्यासाठी आदर्शवत राहील असे करा. राज्यातील शहरे चांगली असली पाहीजेत केवळ बारामती व पिंपरी चिंचवड असुन काय फायदा नाही  कोपरगावही तसेच व्हावे यासाठी मी  प्रयत्नशील आहे. ग्रिन आणि क्लिन कोपरगाव करण्यासाठी आमदार काळे यांच्या नेतृत्वाखाली २८० कोटींची भूमिगत गटार योजना व जल शुदीकरण प्रकल्प सुरु होत आहेत.

विविध विकास योजनांचा आराखडा काळेंनी केला असुन तो राज्यात  इतर शहरांनी कोपरगावचा आदर्श घेण्यासारखा आहे. काळे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे विकास कार्य करतील. तसेच कोपरगावमध्ये कोणी आले काहीही सांगितले, तरी योजना ह्या समाजाच्या भल्यासाठी आम्ही करतो. काही जन थातूर मातुर सांगुन लाडक्या बहीणींची दिशाभूल करण्याचे काम कोणी केले तरी लाडक्या बहीणींनी त्याच्यावर विश्वास ठेवू नये हा तुमचा भाऊ म्हणून सांगतो असे म्हणत अजित पवार यांनी विरोधकावर निशाणा साधत लाडक्या बहीणींना आपुलकीची साद घातली.

 दरम्यान हरित कोपरगाव करण्याची आशा व्यक्त करताना म्हणाले की, शहरातील आरक्षित भूखंड स्वच्छ करुन  शहरातील विविध भागात पहील्या टप्प्यात एक हजार देशी उपयुक्त वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा सल्ला दिला. आधुनिक पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, क्रीडांगण, बागबगिच्या, महापुषांचे  स्मारके, उद्याने, नाट्यगृहास अनेक विकास योजनांचा लेखाजोखा मांडत या पुर्ण करण्यासाठी मी आमदार काळे यांना निधीत कुठेच कमी पडू देणार नसल्याचे अभिवच देवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याची विनंती केली. अजित पवार यांनी कोणावरतीही राजकीय टिका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्दावर बोलुन सर्वांचे लक्ष वेधले.