कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जरी नगरसेवक कमी निवडून आले किंवा आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला तरीही मी विकास कामात खोडा न घालता विकासा कामाला माझं कायम सहकार्य राहील इतकेच काय विरोधकांच्या मिञ पक्षाचे चार नगरसेवक व अपक्ष असलेले एक नगरसेवक यांना जर उपनगराध्यक्ष पदासाठी अथवा पालीकेच्या सभापती पदासाठी पाठिंबा लागला तर तो आमच्यावतीने बिनशर्त देणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

शहरातील गौतम बॅंकेच्या सभागृहात आमदार आशुतोष काळे व राज्य सरकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सुनिल गंगुले, विरेन बोरावके, धरमचंद बागरेचा, मंदार पहाडे, नवाज कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पञकार परिषदेचे आयोजन सायंकाळी करण्यात आले होते यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे पुढे म्हणाले की, नगरपालीकेत या निवडणुकीत जरी विरोधकांना सत्ता मिळाली तरीही आमचं मताधिक्य वाढलेले आहे.

या पुर्वी आमचे केवळ ७ नगरसेवक होते आता ११ नगरसेवक निवडून आले आहेत. आम्ही जरी विरोधात असलो तरीही विकास कामांना विरोध करून कोर्टात जाऊन विकास कामे झुलवत ठेवणार नाही उलट मी जास्तीत जास्त विकास निधी आणुन शहराच्या मुलभूत सुविधांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार आहे. भूमिगत गटार, दररोज नागरीकांना पाणी व रस्ते हे प्रश्न त्वरीत सुटले तरच बाजारपेठेला चालना मिळेल बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी नव्या सहाव्या तलावाची निर्मिती करुन जूना छोट्या दोन तलावावर सोलर बसवून विज निर्मिती करणार आहे तसेच शहराच्या विकासाला भरीव निधी देवून विकास साधणार आहे.

दरम्यान नगरपालीकेतील विजयावर विरोधकांनी हवेत जाऊ नये. तसेच यापुर्वीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जामंत्री असताना कोपरगावसाठी भूमिगत लाईटच्या कामाचे भूमिपूजन केले निधी आला पण शहरातील भूमिगत लाईटचे काम आजूनही झाले नाही तेव्हा तोच प्रकार शहरातील शासकीय जागेत राहणाऱ्या घरांचे उतारे देण्याची घोषणा बावनकुळे यांनी केली पण तीही पूर्ण करतील का असा सवाल करीत विरोधकांची फिरकी घेतली.

यावेळी नगराध्यक्ष पदाचे पराभूत उमेदवार तथा राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, या निवडणुकीत झालेला पराभव मी स्विकारतो माञ त्यांचा विजय म्हणजे गुंडगिरीचा विजय आहे. या निवडणुकीत मला धनशक्ती व दांडगाईचा अनुभव मिळाला. यापुर्वीही मी अनेक निवडणुकीत होतो पण ही निवडणूक वेगळ्या पध्दतीने झाली. निवडणुकीत समता नावाला धरुन विरोधकांनी राजकारण केले बदनामी केली.

थकबाकीदाराला हाताशी धरून राजकारण केले. पण आम्ही ठेविदारांच्या हितासाठी पुन्हा वसुली जोमात करणारच. समतामध्ये ठेविदारांसाठी सुरक्षा कवच असल्याने त्यांच्या ठेवी समतात सुरक्षित आहे. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी त्यांना समताच्या ठेविदारांनी उत्तर दिले आहे. यापुढे समाजकारण करण्यासाठी मला आमदार काळेंची मोलाची साथ आहे. माझ्यावर खालच्या भाषेत टिका करुन निवारा परीसरात मते कमी झाले. तरीही आम्हाला ५७ टक्के मते मिळाली असे म्हणत कोयटे यांनी कोल्हे परिवारावर विविध अंगाने टिका करुन मी व माझी पार्टीच सर्वाधिक मते घेतल्याचे सांगितले.


