नगराध्यक्षांच्या घरासमोरच जलवाहीणी फुटली, लाखो लिटर पाणी वाया

कोपरगाव  प्रतिनिधी दि. ९ : कोपरगाव शहरातील इंदिरापथ येथील गुलमोहर काॅलनीकडे जाणारा रस्ता व नगराध्यक्ष पराग संधान यांच्या घरासमोरच्या चौकात नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने टाकलेली नवीन मुख्य जलवाहिनी अचानक फुटल्याने ऐन दुष्काळजन्य परिस्थितीत लाखो लिटर पाणी पालीका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे  वाया गेले आहे.

या पाणी नासाडीमुळे नागरीकिमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ऐन उतारावर मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाणी नागरीकांच्या घरा दारापर्यंत पोहचले. या संदर्भात अधिक माहिती देताना पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख स्वप्निल जाधव म्हणाले की,  संबधीत जलवाहिनी हि त्या भागातील मुख्य जलवाहिनी आहे. काही दिवसांपूर्वी तेथील लिकेज काढण्यासाठी  नुकतीच दुरुस्ती करुन मुख्य पाइपलाइन पुर्ववत करण्यात आली होती.

त्या भागात इतर खोदकाम तसेच तिथुन जड वाहनाच्या दबावामुळे जलवाहीणीवर दबाव पडुन जलवाही फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले माञ संबधीत जलवाहिनी फुटल्या बरोबर अवघ्या पाच मिनिटात पाणी बंद करण्यात आले. परंतु उतार असल्यामुळे पाणी अधिकचे वाहत होते. राञी  उशिरापर्यंत जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचेही जाधव यांनी सांगितले. 

दरम्यान कोपरगाव नगरपालीकेच्या ढिसाळ कारभारावर नागरीकांमधून संताप व्यक्त होत आहे.  एका बाजुला चार दिवसाड असलेले पाणी कपात करून सहा दिवसाड केले. नागरीकांना पाण्याची बचत करुन काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन पालीका करते आणि दुसरीकडे  लिकेजच्या नावाखाली लाखो लिटर पाणी वाया घालवले जाते अशी खंत नागरीकांनी व्यक्त केली.

Leave a Reply