कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३ : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित एम.बी.ए., इंजिनिअरींग, पाॅलीटेक्निक, फार्मसी, अशा विविध संस्थांनी अद्ययावत ज्ञानाच्या क्षेत्रात करीत असलेल्या भरीव कामगीरीबध्दल व परीणामी अद्ययावत ज्ञानाधिष्ठीत नवतरूण-तरूणी तयार करीत असल्याबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा युएसए स्थित कोर्सेरा या मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस (मुक्स) या प्रदाती कंपनीने ‘सोशल इम्पॅक्ट’ या पुरस्कारने दिल्ली येथे शानदार सोहळ्यात गौरव केला.
कोर्सेराचे सीईओ जेफ मॅगिओनकाल्डा यांचे हस्ते संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व डाॅ. ए. बी. पवार (डीन अकॅडमिक्स) यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.
कोर्सेरा मार्फत जगातील सुमारे १५० पेक्षा अधिक नामवंत विद्यापीठांनी सर्व क्षेत्रातील व्यक्तींना आपापल्या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान घेण्यासाठी तयार केलेल्या अभ्यासक्रमांचे ४ ते १२ आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येते. यात कोर्सेराच्या नियमावली नुसार ऑनलाईन व्हीडिओ लेक्चर्स ऐकणे, गृहपाठ सोडविणे, इत्यादी बाबींचा समावेश आहे. व अभ्यासक्रमाचा कालावधी संपल्यानंतर ऑनलाईन परीक्षा घेवुन यशस्वी विध्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिल्या जाते. सदर सर्टिफिकेटस चा उपयोग नोकरी मिळण्यासाठी, नोकरीत असाल तर पदोन्नती साठी होतो.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित सर्वच संस्थांनी आजी माजी विध्यार्थी व प्राद्यापकांना कोर्सेराद्वारा देण्यात येणारे कोर्सेस शिकण्यासाठी प्रवृत्त केले, त्यामुळे त्यांच्या ज्ञानात आधुनिकतेची भर पडली. या सर्व बाबींची दखल घेवुन कोर्सेराच्या भारतातील तिसऱ्या वर्धापनाच्या निमित्ताने संजीवनीला सोशल इम्पॅक्ट अवार्डने सन्मानित करून संजीवनीच्या कार्याची पावती दिली. कोर्सेराचे व्यवस्थापकिय संचालक श्री दुलेस कृष्णन , श्री मल्लव आचार्य आणि शुभांगी सुद यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबध्दल श्री अमित कोल्हे यांनी त्यांचेबध्दल धन्यवाद व्यक्त केले.
कोर्सेराच्या कोर्सेसमुळे ज्यांनी ते पुर्ण केले, त्यांना खुप फायदा झाला आहे. म्हणुन आता संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने कोर्सेरा सोबत सामंजस्य करारच केला आहे. संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी मोठ्या प्रमाणावर ओपन ऑनलाईन कोर्सेसला अभ्यासक्रमाचा एक भाग बनविण्याची संकल्पना मांडली आहे. त्यामुळे संजीवनी लवकरच करीअर अकॅडमी सुरू करणार आहे. या व्यासपीठाद्वारे सध्या उद्योग जगताला अपेक्षित असणारे मनुष्यबळ मिळण्यास तसेच अनेकांना अधिकचे प्रभुत्व मिळविण्यास मदत होणार आहे. – अमित कोल्हे