कोपरगाव प्रतिनिधी, दि.२४: कोपरगाव शहरालगत असलेल्या टाकळी फाटा परिसरातील धोंडीबानगर येथील एका मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या २८ जुगारी सह त्याच्याजवळील रोख रकमे बरोबर इतर मुद्देमालासह तब्बल २३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करुन धडक कारवाई केल्याने जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या घटनेची पोलीसांकडू मिळालेली अधिक माहीती अशी की, कोपरगाव शहरासह उपनगरात वाढलेल्या अवैध व्यवसायीकांनी धुमाकूळ घातला याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना समजल्याने त्यांनी कोपरगाव शहरात बुधवारी राञी आपल्या पथकाला पाठवले गुप्त माहीतीच्या अधारे कळाले की, शहरालगत असलेल्या धोंडीबानगर येथे एका मोकळ्या जागेत तीनपत्ते जुगार खेळत असल्याची माहीती मिळाली.
त्यानुसार बुधवारी राञी ९ वाजण्याच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक डी.एस. मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान गोरे इतर १२ कर्मचाऱ्यांच्या पथकांनी धाड टाकुन तीन पत्त्याचाजुगार खेळणाऱ्या, शेखलाल शेखचाॅंद बागवान रा. चर्च रोड कोपरगाव, शितल सुभाषचंद्र लोहाडे रा.सावता नगर मालेगाव जिल्हा नाशिक,
नंदू पूंजा नजन रा. बनरोड राहता, वीजय केदू निमसे रा. रमाईनगर मनमाड, इमरान याकूब मोबी रा. जमदाडे चौक मनमाड, कलीम भिकन बागवान रा. इंदिरानगर कोपरगाव, अशपाक जमील शेख रा. शांतीनगर मनमाड, नितीन उत्तम शेजवळ रा.राजवाडा लासलगाव ता. निफाड , राहुल दिलीप बाराशे रा. मनमाड आनंदवाडी, नाना शबा डोळसरा रा. सुभाषनगर कोपरगाव,
शेख अमजद हाशम रा. खडकी कोपरगाव, सुरेश कुंडलिक सातभाई रा.येवला नाशिक, गणेश विठ्ठल जेजुरकर रा.पानमळा शिर्डी, अनिल देवराम खरात रा. लासलगाव निफाड, योगेश मुकुंद रासकर रा. येवला, दीपक रामदास उंबरे रा.कोपरगाव, तुषार राजेंद्र जोशी रा.टिळक नगर कोपरगाव, मोहसीन कलंदर सय्यद रा सुराला ता. वैजापूर, दीपक मायकल बनसोडे रा. स्वामी समर्थ नगर वैजापूर, रवींद्र माधव येवला रा. रोड कोपरगाव, हरिलाल फकीरा डांचे रा.संगमेश्वर ता. मालेगाव, सुदाम पंढरीनाथ नवले रा. तांबोळ अकोले, हरी दगडू करवर रा.बाभुळवंडी अकोले,
वीरेंद्र अरुणसिंग परदेशी रा. येवला, युनूस इक्बाल शेख रा. खडकी, सुभाष लक्ष्मण सावडेरा. बाभुळवंडी अकोले, सोमनाथ बापू वाळके रा. लासलगाव ता. निफाड अशा तब्बल २८ व रोपींना तीनपत्ती तिरट नावाचा जुगार खेळताना रंगेहात पकढण्यात आले.
त्यांच्याकडून तिनपत्ते तिरट जुगाराच्या साहीत्यासह २ लाख ५ हजार ६७० रुपये रोख तसेच १ लाख ८९ हजार ७०० रु किंमतीचा चे ३० मोबाईल, १९ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या ४ चारचाकी व ७ मोटारसायकली असा २३ लाख ३५ हजार ३७० रूपयांचा मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शंकर संपत चौधरी यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये वरिल २८ व्यक्तवर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
दरम्यान बुधवारी राञभर जुगार खेळणाऱ्याना पकडण्यात व त्यांच्यावर योग्यती कारवाई करण्यात पोलीस दंग होते. कोपरगाव शहर पोलीस पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकांनी विविध कारवाया करुन गुन्हेगारावर वचक बसवण्याचा प्रयत्न करीत असले तरी शहरातील अवैध धंदे जोमात सुरु आहेत.