शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : तालुक्यातील बालमटाकळीला सलग पाचव्यांदा एक लाख रूपये किमतीचा एलआयसीचा विमा ग्राम पुरस्कार प्राप्त झाला. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आसून एलआयसीच्या विमा ग्रामच्य पुरस्काराने गावच्या विकास कामात भर पडून गावचा सर्वांगीण विकास होत असल्याचे प्रतिपादन एलआयसीचे शाखाधिकारी मनोज देव यांनी केले.
विमा प्रतिनिधी जालिंदर जाधव यांच्या विशेष प्रयत्नामुळे पुणे विभागातून सलग पाचव्यांदा मिळालेल्या एक लाखाच्या विमा ग्राम पुरस्कार वितरण सोहळ्यात एलआयसीचे शाखाधिकारी मनोज देव बोलत होते.
सरपंच डॉ. राम बामदळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी सहाय्यक शाखा प्रबंधक मनदीप सैनी, माजी विकास अधिकारी वसंत देवधर, कृ. उ. बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक मोहनराव देशमुख, कासमभाई शेख, सुकळीचे सरपंच लहूराव भवर, दामोधर वैद्य, दिगंबर बागडे, ताराचंद शेळके, संदीप देशमुख, बंडू शिंदे, सुरेश काजवे, रामजी पाथरकर, संदीप शिंदे, संभाजी घोरपडे, बाबासाहेब वाघुंबरे, रशीद शेख, राजेंद्र ईंगावले, काकासाहेब भाकरे, अमोल बामदले, मोहन शेळके, दिलीप भोंगळे, वजीर शेख, जयराम देवढे, विठ्ठल देशमुख, यांच्यासह ग्रामस्थ, विमाधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भारतराव घोरपडे यांनी केले, प्रास्ताविक जालिंदर जाधव यांनी केले, तर अशोक खिळे यांनी आभार मानले.