शेवगाव परिसरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शेवगाव प्रतिनिधी, दि.२७ : ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या जयघोषात शेवगाव परिसरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने ठीक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नगर रस्त्यावरील दादाजी वैशंपायन नगरात दत्त जयंती निमित्त ह.भ.प.दयानंद महाराज कोरेगावकर यांचे दत्त जन्मावर कीर्तन झाले.

यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष अर्जुन फडके, सचिव फुलचंद रोकडे, शरद काका वैशंपायन यांच्यासह आमदार मोनिका राजळे तहसीलदार प्रशांत  सांगडे, डॉ, सुभाष चंद्र बाहेती, भारती बाहेती, दिलीप फलके, ॲड.विजय काकडे, बन्सी पांगरे, हनुमान जोशी, पुरुषोत्तम धूत, रोटरी क्लबचे अध्यक्ष मनीष बाहेती यांनी दत्त जन्माच्या पाळण्याची दोरी ओढली. पंचायत समितीच्या प्रांगणातील दत्त मंदिरात ह.भ.प डमाळे महाराज यांचे किर्तन झाले.

तसेच वीज वितरण कंपनीच्या २३२ ही प्रांगणात शिवशाहीर कल्याण काळे यांचे दत्त जन्मावर कीर्तन झाले. याशिवाय पोलीस ठाणे, बस स्थानक, ब्राह्मण गल्लीतील भारदे यांच्या दत्त मंदिरात, दत्त जन्मोत्सवाचा सोहळा हजारो भाविकांत न करता केवळ हौसउपस्थितीत पार पडला, खंडोबा नगर परिसरातील श्री स्वामी समर्थ देवस्थानात दत्त जयंती निमित्त पार पडलेल्या श्रीदत्त पारायणाची उत्साहात सांगता झाली. पारायण उपक्रमात महिला  भाविक भक्तांची मोठी उपस्थिती होती. आमदार राजळे त्यांच्या हस्ते श्री गुरुदत्तांची आरती होऊन सोहळ्याची सांगता झाली.

श्रीक्षेत्र अमरापूर येथील श्रीरेणुका देवस्थानात आयोजित श्रीदत जयंती सोहळ्यात ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव, रेणुका भक्तानुरागरी मंगल, व जयंती भालेराव, रेखा गुलाटी, कुंदा मुळे, छाया कुलकर्णी, देवस्थानचे पुजारी तुषार देवा यांनी पाळणा व आरती म्हटली. राहूल वाघमारे, संजय कर्डिले, बाळू माने यांनी भाविकासाठी दिवसभर महाप्रसादाची व्यवस्था पाहिली.