कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ : स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२८ ते जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२४ दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात येणाऱ्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या सॉफ्टबॉल संघात संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या सत्यम सोमनाथ ठुबे या खेळाडूची निवड झाली असुन तो स्पर्धेच्या पुर्व तयारीसाठी जळगाव येथे महाराष्ट्र राज्याच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिबिरासाठी रवाना झाला आहे, अशी माहिती कॉलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
सत्यमच्या या यशाबद्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी त्याचा छोटेखानी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य डॉ. राजन शेंडगे, क्रीडा प्रशिक्षक प्रा. अक्षय येवले उपस्थित होते. तसेच संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सत्यमचे अभिनंदन करून त्याला राष्ट्रीय खेळासाठी शुभेच्छा दिल्या.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, वेगवेगळ्या विभागीय पातळीवरून एकुण ३८ खेळाडू निवडण्यात आले होते. यातुन फक्त १६ खेळाडू राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्राच्या संघात निवडण्यात आले. या निवड चाचणी मध्ये सत्यमने उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत संघात स्थान प्राप्त केले. सत्यमच्या या निवडीमुळे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित विविध संस्थांचे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर सुध्दा आघाडीवर असतात, ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
सत्यमला आता महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्यामुळे एम.पी.एस.सी. अखत्यारीतील सरकारी नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण मिळणार आहे. आणि राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा संघ जिंकलाच तर त्याला यु.पी.एस.सी आणि एम.पी.एस.सी. च्या अखत्यारीतील दोनही ठिकाणच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथिल राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी देशातील पत्येक राज्यातील एक संघ असणार आहे