वाघोली शाळामध्ये कृषी व्यवसाय विषयक मार्गदर्शन शिबिर

शेवगाव प्रतिनिधी, दि.०६ :  नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाघोली मध्ये कृषी व्यवसाय विषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, होडशीळ यांनी मार्गदर्शन केले.

सध्याच्या आधुनिक काळातील शेतीमध्ये सेंद्रिय/जैविक खतांचा वापर याविषयी त्यांनी बहुमोल माहिती देवून रासायनिक खतांचा व औषधांचा आरोग्यावर कसा दुष्परिणाम होतो याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या आहारात तृणधान्याचा जास्तीत न वापर करावा तसेच पॉलिश तांदळा ऐवजी रेशन किवा विनापॉलिश तांदळाचा आहारात वापर करावा.

सेंद्रिय खतावर पिकवलेला भाजीपाला आहारात वापरावा जेणेकरून कॅन्सर सारख्या दुर्धर आजारापासून दूर राहता येईल. यावेळी शाळेत कार्यान्वित गांडूळ खत प्रकल्प व बायोगॅस प्रकल्प पाहून त्यांनी सरपंच सुष्मिता भालसिंग, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक यांचे अभिनंदन केले.

गावचे युवा कार्यकर्ते उमेश भालसिंग यांनी प्रास्ताविक करतांना शाळेत राबवीत असलेल्या विविध उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.
या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आहेर यांचेही भाषण झाले. मुख्याध्यापिका श्रीमती गोरेयांनी आभार मानले.