देवळणे ते काशीद वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ


शेवगाव प्रतिनिधी , दि.०६ :
  आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नातून २५ /१५ अंतर्गत शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील देवळणे ते काशीद वस्ती हा पाचशे मिटर लांबीचा ३० लक्ष रुपये किमती खर्चाच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष  ताराभाऊ लोंढे, वाय डी कोल्हे, ह.भ.प. कल्याण महाराज पवार यांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी लोढे यांनी दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या व दुर्दशा झालेल्या रस्त्याचे काम आमदार राजळे यांचे पाठपुराव्यामुळे मार्गी लागल्या बद्दल त्यांना स्थानिकांच्या वतीने धन्यवाद देवून हे काम अत्यंत दर्जेदार होणार असल्याची ग्वाही दिली.

या उद्घाटन सोहळ्यास संदिप खरड, अनिल भाऊ सुपेकर, गुरुनाथ माळवदे, कल्याण जगदाळे, बाळासाहेब विखे, लक्ष्मण काशीद, मनोज काळे, मोहन खंडागळे, आप्पा गिरम, सुभाष बरबडे, आप्पा सुकासे, सचिन खंडागळे, अशोक दळवी, आदिल पठाण यांचे सह दहिगावनेचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.