शेवगाव प्रतिनिधी, दि.२८: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना कार्यान्वीत केल्या असून जिल्हयातील जनतेला त्याचा लाभ देण्यासाठी खा.सुजय विखे प्रयत्नशील राहिले आहेत. मतदार संघाचा मोठा विस्तार असतांना देखील त्यांनी तळागाळातील अनेक प्रश्नांसाठी निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे रस्ते, वीज आणि पाणी या मुलभुत प्रश्नांसाठी नागरिकांचा संघर्ष वाचला आहे. असे प्रतिपादन धनश्री सुजय विखे यांनी केले.
तालुक्यातील सामनगाव ते लोळेगाव या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ धनश्री विखे यांच्या हस्ते झाला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते बापुसाहेब पाटेकर, अरुण कापरे, बाळासाहेब कोळगे, विजय कापरे, भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल सागडे, सरपंच आदिनाथ कापरे, ग्रामसेवक देविदास पंडीत, उपसरपंच संगिता नजन, बाळासाहेब नजन, संजय खरड, अनिल खैरे, अरुण काळे, प्रमोद कांबळे, तुकाराम कापरे, इंदुबाई बावधनकर आदी प्रमुख उपस्थित होते.
आव्हाणे बुद्रुकच्या स्वयंभू गणेशाला अभिषेक घालून सभामंडपाच्या कामाची केली पहाणी आव्हाणे बुद्रुक ता. शेवगाव येथे स्वयंभू निद्रिस्त गणेशाच्या यात्रोत्सवानिमीत्त धनश्री विखे यांनी देवस्थानला भेट देवून अभिषेक केला. यावेळी खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नातून सुरु असलेल्या सभामंडपाच्या कामास भेट देवून पाहणी केली. यावेळी संजय कोळगे, सुधाकर चोथे, रामदास कोळगे, सागर चोथे, अनिल खैरे उपस्थित होते.
मंगळवारी (दि.२७) धनश्री विखे यांच्या हस्ते लोळेगाव ते चंदन खडक, दलीत वस्ती अंतर्गत रस्ता, मळेगाव शे येथे दलीत वस्ती अंतर्गत रस्ता, खासदार निधी अंतर्गत मळेगाव ते निकम वस्ती रस्ता, ढोरजळगाव ने येथे दलीत वस्ती अंतर्गत रस्ता व तांडा सुधार वस्ती योजनेअंतर्गत कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी लोळेगाव येथे सरपंच सुनिता काळे, भानुदास काळे, राजू शिनगारे, माजी सरपंच बाबासाहेब पठाडे, नाना लेंडाळ, मळेगाव शे येथे आण्णासाहेब ढोके, सरपंच सुरज घोरपडे, आण्णा निकम, ढोरजळगाव ने येथे सरपंच मंगल कराड, अनंता उकिर्डे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक विनोद शेळके यांनी केले. तर उमेश कापरे यांनी आभार मानले.