गौतम पब्लिक स्कूलमध्ये इंटर हाऊस स्पर्धा सुरू 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल मध्ये दि. ७ डिसेंबर २०२४ पासून संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंटरहाऊसेस स्पर्धा सुरू झाल्या असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.

गौतम पब्लिक स्कूल मधून उद्याचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत या उदात्त हेतूने संस्था विश्वस्त आमदार आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव  चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या शिस्तबद्ध नियोजनाखाली दरवर्षी इंटर हाऊसेस स्पर्धांचे मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते. 

 यावर्षी देखील या स्पर्धा सुरू झाल्या असून  शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात स्पर्धेचे उद्घाटन करण्यात असेल. यावेळी पर्यवेक्षिका ज्योती शेलार, प्राथमिक विभाग प्रमुख राजेंद्र आढाव, क्रीडा संचालक सुधाकर निलक , रमेश पटारे, इसाक सय्यद, सर्व शिक्षक वृंद तसेच खेळाडू मोठ्या संख्येने हजर होते. 

सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी ग्रीन, ऑरेंज, ब्ल्यू व यलो या चार हाउसेस मध्ये विभागले जातात. इंटर हाउसेस स्पर्धांमध्ये क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, तसेच वकृत्व, नाट्य, चित्रकला अशा स्पर्धा घेतल्या जातात. सर्व सामने अतिशय संघर्षपूर्ण होतात. स्पर्धा १७ वर्ष, १४ वर्ष व १२ वर्ष वयोगटात घेतल्या जातात. 

उद्घाटनपर झालेल्या १७ वर्षाखालील क्रिकेट सामन्यात यलो हाऊस संघाने ग्रीन हाऊस संघाचा पाच धावांनी निसटता पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात ऑरेंज हाऊस संघाने ब्ल्यू हाऊस संघाचा आठ धावांनी पराभव केला. 

स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक म्हणून क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद, कला शिक्षक गोरक्षनाथ चव्हाण, ग्रीन हाऊस हाऊस मास्टर राजेंद्र आढाव, ब्लू हाऊस हाऊस मास्टर प्रकाश भुजबळ, ऑरेंज हाऊस हाऊस मास्टर नसिर पठाण, मास्टर उत्तम सोनवणे आदी काम पाहत आहे.

गौतम पब्लिक स्कूलचा क्रीडा क्षेत्रात मोठा धबधबा असून विविध क्रीडा स्पर्धांमध्ये गौतम पब्लिक स्कूल मोठे यश मिळविले आहे. हॉकी, फुटबॉल, क्रिकेट अशा राष्ट्रीय दर्जाच्या खेळांमधून विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे काम गौतम पब्लिक स्कूलच्या माध्यमातून होत आहे.संस्थेचे मार्गदर्शक विश्वस्त आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात अशा क्रीडा स्पर्धांमधून राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडले जावेत यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.- चैताली काळे.

Leave a Reply