शेअर मार्केट ट्रेडिंग नावाखाली गंडा घालणाऱ्या दोघांना अटक

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : शेअर मार्केट ट्रेडिंग नावाखाली अधिकचा परतावा देण्याचे आमिष दाखवून ३३ लाख ५० हजार रुपयांना गंडा घालणारे दोन जण पळून जाण्याच्या तयारीत असताना शेवगाव पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अवधुत विनायक केदार ( वय ४६ वर्षे रा. साईकृपानगर, आखेगाव रोड शेवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरुकृपा ट्रेडिंग इनव्हेस्ट शेअर मार्केट ट्रेडींगच्या नावाखाली, सखाराम नामदेव ढोरकुले ( वय-२७ रा. बाभुळगाव ता. शेवगाव ) व फ्रांन्सीस सुधाकर मगर ( वय-५० रा. आखेगाव रोड शेवगाव ) यांनी फिर्यादी तसेच त्यांचे इतर साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन ३३ लाख ५० हजार रुपयांची फसवणुक केल्या प्रकरणी रविवार दि. १५ डिसेंबर रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी तपास कामी पोलीस पथक तयार करुन, सूचना देत आरोपींच्या अटकेसाठी रवाना केले. सखाराम ढोरकुले याला शेवगाव- पैठण रोडने जात असताना मोटर सायकल वर पाठलाग करुन पकडले. तसेच फ्रांन्सीस मगर याला आखेगाव रोड शेवगाव येथुन ताब्यात घेऊन, दोघांना शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणुन नमुद गुन्ह्यात अटक केली आहे. त्यांना जिल्हा सत्र न्यायालय, अहिल्यानगर येथे हजर केले असता त्यांना ८ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहायक पोलिस निरिक्षक प्रविण महाले, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे, पोलीस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ, संतोष वाघ, राहुल खेडकर, नकुल फलके, धनेश्वर पालवे, प्रशांत आंधळे, देविदास तांदळे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे राहुल गुंडु यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास प्रविण महाले करत आहेत. या आरोपीकडून कोणाची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यास बिनधास्तपणे संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी केले आहे. 

Leave a Reply