पोहेगावात भरदिवसा सोनाराच्या दुकानावर दरोडा

सोनार माळवेसह मुलगा जखमी, ग्रामस्थांनी तलवारीसह दोन चोरटे पकडले, एक जण पळाला

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : तालुक्यातील पोहेगाव येथे पल्सर गाडीवर आलेल्या चोरट्याने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास माळवे सराफ या दुकानावर दरोडा टाकला. तर शेजारी वेदांत फुटवेअर व बाबा कलेक्शन या दुकानावरही दहशत केली. या चोरट्यांकडे तलवारी व गावठी कट्टा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. माळवे सराफचे मालक ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा मुलगा यात जखमी झाला आहे. दोन जण दरोडाखोर पकडले असुन एकजण पळुन गेला आहे.

कोपरगाव सांगमनेर रस्त्यावर पोहेगाव येथे  माळवे सराफ नावाचे दुकान आहे. दरोडेखोर दुकानात घुसुन दहशत निर्माण करत दुकानातील सोन्याचे दागीणे पिशवीत भरण्यास लागले होते.आजूबाजूला रहदारी चालू असल्याने माळवे यांनी आरडाओरडा केला असता स्थानिकांनी चोरट्यांना पळून जाताना बघितले. काही तरुणांनी धाडस करत या तरुणांना पकडले. नंग्या तलवारी काढत या चोरट्यानी दहशत केली मात्र गावातील जमावाने त्यांना पकडले.

चोरट्यांची दहशत पाहुन काही तरूण आक्रमक झाले. चोरट्यांना नंगे करून बेदाम चोप दिला. शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत माहिती मिळाल्यावर शिर्डीचे डीवायएसपी शिरीष वमणे, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, गणेश घुले यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेतील चोरट्यांना त्यांनी ॲम्बुलन्स मध्ये घालून पुढील उपचारासाठी नेले आहे. चोरट्यांनी दहशत केली मात्र ती चोरट्यांच्याच अगलंट आली.

चोरट्यांचे मोबाईल व गुन्हात वापरलेली मोटरसायकल ही ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली. जखमी सोनार ज्ञानदेव माळवे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply