दुष्काळाच्या झळा तीव्र, जनावरांच्या खरेदी विक्रवर परिणाम

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : तालुका मुळातच कमी पावसाचा पट्टा आहे. त्यातच चालु वर्षी संपूर्ण राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांची उभी पिकं  जळून खाक झाली. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांच्याकडे  लाईट नसल्याने पाण्याअभावी तालुका होरपळून निघाला. परतीच्या पावसाची वाट पहात बसलेल्या शेतकऱ्यांना चक्क हिवाळ्यात उन्हाची तिव्रता वाढल्याने संपूर्ण शेतकऱ्यासह  नागरीकांच्या जीवाची लाही लाही होत आहे.

चारा पाण्याची भिषण समस्या निर्माण होण्याच्या आगोदरच शेतकरी आपल्या गोठ्यातील दूभत्या  गायी जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी उभ्या करीत आहेत. आता दोन पैसे चांगला भाव आला तर त्याच पैशाने पुढे चारापाण्याची व्यवस्था झाल्यावर पुन्हा गायी घेता येईल या आशेने विक्री करीत आहेत. पण जनावरांच्या बाजारातील चिञ एकदम उलटे झाले आहे. व्यवस्थित भाव तर दूरच विक्रीसाठी आणलेल्या गायी घेण्यासाठी कोणी पुढे येईना. बहुतांश शेतकरी चाऱ्या अभावी जनावरे विकत आहेत पण  जनावरे  विकत घेण्यासाठी दुसरा शेतकरी  पुढे येत नाहीत.

जनावरांची  खरेदी विक्री करणारे व्यापारी सुध्दा अतिशय अल्पदरात खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही व्यापारी व शेतकरी खरेदी ऐवजी जवळ आहेत तेच जनावरे विकताना दिसत  होते. या सर्व घडामोडींचा परिणार सोमवारी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या बाजारात पहावयास मिळाला. अतिशय कमी दरात जनावरांची खरेदी विक्री  होत असल्याचे दिसून आले.  चांगल्या प्रतितेची अधिक  दूध देणारी लाखाची गाय केवळ ६ ० हजाराला मागितली जात होती.  कमी दूध देणाऱ्या आणि न दूध देणाऱ्या गायींची खरेदी करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते .

खाटे व कमी दूध देणारे जनावरे शेतकऱ्यांनी दारात उभे केले तर चाऱ्यांचा प्रश्न गंभिर आहे. विक्रीसाठी घेवून आले तर बाजारात किमंत नाही. खाट्या गायींना तर कोणीच विचारत नसल्याने शेतकऱ्यांच्या पुढे मोठं  संकट निर्माण झालं आहे.  शेतातली पिकं गेली. दारातली दूभती जनावरे चाऱ्या पाण्या अभावी सांभाळायची कशी हा मोठा प्रश शेतकऱ्यांपुढे पडला आहे. आगामी काळात दुष्काळाच्या झळा अधिकच तिव्र होणार असल्याने शेतकऱ्यांच्या पुढे अनेक समस्यांचा डोंगर उभा  राहणार आहे.

 कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांनी दिलेल्या माहीती नुसार  सोमवारी बाजारात  १९२ गाड्यातून  तब्बल ४९५ जनवारे विक्रीसाठी आले होते अनेक जनावरांंची कमी भावात कशीबशी विक्री करीत २८२ जनावरांची खरेदी विक्री झाली. तर २१३ जनावरे शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी परत घेवून  गेले. कोपरगाव तालुक्यासह  शेजारच्या तालुक्यातील निफाड, श्रीरामपूर ,चांदवड, संगमनेर, येवला, नांदगाव, चाळीसगाव , नेवासा घोडेगाव  येथून शेतकरी व व्यापारी जनावरे खरेदी विक्रीसाठी येतात तर थेट  ठाणे, कल्याणसह मराठवाड्यातील बडे व्यापारी जनावरे खरेदीसाठी कोपरगाव बाजार समितीत येत असतात. 

परंतु हिवाळ्यातच उन्हाळा जाणवू लागल्याने शेतकरी व व्यापारी जनावरांची खरेदी विक्री करताना धाडस करीत नसल्याने अर्थात खरेदी कमी विक्री ज्यास्त त्यात आगामी काळात चारा पाण्याची समस्या निर्माण होण्याच्या भितीने. जनावरांच्या किती मोठी घसरन होत असल्याचे सांगितले.  काहीही झाले तरी  कोपरगाव तालुक्यात  दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. 

Leave a Reply