के.जे.सोमैया महाविद्यालयात ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन
कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात नुकतेच ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी दिली आहे. या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोक रोहमारे, सचिव मा. ॲड. संजीव कुलकर्णी, मा. जवाहर शहा, मा. सुनील बोरा, मा. प्रशांत ठोंबरे, संस्थेचे विश्वस्त मा. संदीप रोहमारे, डॉ.रिद्धी गोराडिया व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने निर्मित या वस्तू संग्रहालयामध्ये प्राचीन भारतातील जनपद, गुप्त, ग्रीक, सातवाहन, विजयनगर, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, शिवकालीन, पेशवेकालीन व ब्रिटीश कालखंडापर्यंतच्या दुर्मिळ नाण्यांबरोबरच जुन्या दुर्मिळ तलवारी, ढाल व अन्य शस्त्रांची गॅलरी, पेशवेकालीन इशारतीची तोफ, ब्रिटीशकालीन कुलुपे, दुर्बीण (टेलिस्कोप), दिशादर्शक यंत्र (कंपास), भिंग, टेलीफोन, कॅलेंडर, दरवाजावरील बेल, ताम्र-पाषाणयुगीन मृदुभांडे अशा ऐतिहासिक वस्तूंचा समावेश आहे. तसेच कोपरगाव तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मंदिरांचे व वास्तूंचे दुर्मिळ फोटो, छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्मिळ चित्र, छत्रपती संभाजी महाराजांचे दुर्मिळ चित्र हे देखील या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी मा.आशुतोषदादा काळे यांनी ऐतिहासिक वस्तू
Read more









