कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा बुधवारी गळीत हंगाम प्रारंभ      

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ : सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२२/२३ च्या ६८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवार (दि.०२) रोजी दुपारी ०३.०० वाजता कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक, जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे व त्याच्या सुविद्य पत्नी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांचे अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी दिली आहे.  

          कारखाना विस्तारीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम प्रगतीपथावर आहे. पैकी नवीन बॉयलरचे काम पूर्ण झाले असून २०२२-२३ गळीत हंगाम हा नवीन मिल व नवीन ११० मे.टन बॉयलरवरच घेतला जाणार आहे. कारखान्याच्या गाळप हंगाम २०२२/२३ च्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्यावर व उद्योग समुहावर प्रेम करणारे हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी केले आहे.