कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये श्रीगणेशाच्या विद्यार्थी साईशा संतोष डांगे हिने २०२ व अदिती बाळासाहेब चव्हाण हिने १८४ गुण मिळवून अनुक्रमे ६ वी व ८ वी वर्गात प्रथम क्रमांक मिळविला. राहाता केंद्रावर घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये श्रीगणेशच्या २० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे दिली.
यामध्ये निकिता नितीन डांगे, अथर्व संतोष चौधरी, तेजश्री पंकज शेळके, साईशा संतोष डांगे, पाविनी पंढरीनाथ चौरे, कस्तुरी प्रशांत डांगे, अनुराधा धनंजय वर्पे, श्रेया प्रभाकर डांगे या ५ वी वर्गातील विद्यार्थ्यांनी तसेच अदिती बाबासाहेब चव्हाण, साक्षी प्रमोद झोडगे, समृद्धी कानिफ गुंजाळ, तन्मय निलेश पेंडभजे, साईशा माधव गव्हाणे, गौतमी रमेश चौधरी, ओम मछिंद्र दिघे, संस्कृती संदीप पाचोरे, ओंकार संतोष डांगे, प्रीती संतोष सोनवणे या ८ वी वर्गातील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमीचंद लोढा, विश्वस्त कामिनी शेटे, भारत शेटे, रवींद्र चौधरी, सुरेश गमे, देविदास दळवी, महावीर शिंगवी, संदीप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मूनावत, स्वप्निल लोढा, चिराग पटेल, आकाश छाजेड, गणेश कुऱ्हाडे, प्राचार्य रामनाथ पाचोरे, पंकज खंडांगळे, पर्यवेक्षक प्रवीण चाफेकर, निलेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या विद्यार्थ्यांना प्रा.आदिनाथ दहे, साईनाथ पाठक, संतोष सुपेकर, दिपक गव्हाणे, सविता शिरोळे, प्रियांका खरात यांचे यशस्वी मार्गदर्शन लाभले.
श्री गणेश शैक्षणिक संकुलच्या ” श्री गणेश पॅटर्न” ने पुन्हा एकदा उंच भरारी घेतली आहे. संकुलाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषध निर्माणशास्त्र परीक्षेतील यशाबरोबरच शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणे हि आमच्यासाठी भूषणावह बाब आहे. – प्रा. विजय शेटे