शेवगांव प्रतिनिधी, दि. १५ : आमदार मोनिका राजळे यांच्या स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील मौजे खामपिंप्री येथील हनुमान मंदिरासमोरील १५ लाख रुपये खर्चाच्या सभामंडप, कोळगांव व हसणापुर प्रत्येकी रु. १० लाख खर्चाच्या कामाचे भूमिपुजन आज आमदार मोनिकाताई राजळे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी आ.राजळे म्हणाल्या, ताजनापुर सिंचन योजनेच्या राहिलेल्या कामाचे . १०८ कोटी रुपयाचे टेंडर झाले असून यावर्षी रु. १३ कोटीची तरतूद झालेली आहे. आतापर्यंत या योजनेच्या वितरण कुंडापर्यंतची सर्व कामे झाली असून आता शेतकऱ्यांच्या शेतापर्यंतच्या पाईपलाईनची कामे सुरु आहेत.
त्याचबरोबर मिरी-शेवगांव, शेवगांव-पैठण, शेवगांव-गेवराई, शेवगांव-तिसगांव या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असून आठवडयाभरात ही कामे देखील सुरु होतील. भाजपा-सेना युतीच्या काळामध्ये आपण आपल्या मतदारसंघामध्ये मोठा विकास निधी आणला, परंतू महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये पुरेसा निधी न आल्याने विकास कामांना खिळ बसली होती. परंतू आता पुन्हा राज्यात आपले सरकार आल्याने मोठया प्रमाणात कामे मार्गी लागणार आहेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, मारुती महाराज झिर्पे, तालुका अध्यक्ष ताराचंद लोढे, सुनिल रासने यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी भाजपा सरचिटणीस भिमराज सागडे, बाबासाहेब किलबिले, संजय खेडकर, डॉ. लंवाडे, संभाजी कातखडे, साईनाथ झिर्पे, सुरेश नेमाणे, बाळासाहेब झिर्पे, शोभाताई ढाकणे, लक्ष्मण इसारवाडे, अनिता उंदरे, गणेश ढाकणे, नवनाथ ढाकणे, अर्जुन ढाकणे, दादासाहेब भुसारी, लक्ष्मण देवढे, शरद चाबुकस्वार, लक्ष्मण दसपुते, श्रीरंग गोर्डे, दिलीप विखे, ज्ञानदेव मुळे, बाबा सावळकर त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रल्हाद पाठक, आदि उपस्थीत होते.