रुग्णवाहिका उपलब्ध करून जनसेवा करणारी पोहेगांव ग्रामपंचायत आदर्शवत – इंदुरीकर

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळाच्या नागरिकापर्यंत पोहोचविण्याचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीस वर्षापासून पोहेगावांत अविरत चालू आहे. त्यामुळेच येथे विकास कामे पाहायला मिळत आहे.

पोहेगांव पंचक्रोशीतील रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी ग्रामपंचायतीने रुग्णवाहिका खरेदी करत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. तालुक्यात रुग्णवाहिका खरेदी करणारी ही एकमेव आदर्शवत ग्रामपंचायत आहे असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे श्री झोटिंग बाबा मंदिर परिसरात रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना बोलत होते.

पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे यांनी १५ वा वित्त आयोग सन.२०२१-२२ (पं.स.स्तर) चे स्थानिक विकास निधीतून जी रक्कम उपलब्ध करून दिली होती त्यात  ग्रामपंचायतीने स्व निधी वापरून जनसेवेसाठी जवळपास नऊ लाख रुपये किंमतीची रुग्णवाहिका खरेदी केली. तिचे लोकार्पण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवसेना नेते नितीनराव औताडे, प.स.सदस्य बाळासाहेब रहाणे, सरपंच अमोल औताडे, उपसरपंच प्रशांत रोहमारे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र टिळेकर, अशोकराव नवले, प्रकाश औताडे, चांगदेव वाके, प्रकाश रोहमारे, निवृत्ती औताडे, बाळासाहेब औताडे, चांगदेव शिंदे, मारुती औताडे, साहेबराव देशमुख, गजानन वाघ, सीताराम वाके, नितीन चौधरी, बापूसाहेब औताडेसुनिल चौधरी, सोमनाथ वाके, विनायक मुजगुले, विजय वाके, आण्णासाहेब औताडे, दिलीप वाके, प्रदिप गायकवाड, साहेबराव वाके, ज्ञानदेव वाके, अशोक वाके, जयवंत भालेराव, शिवाजी जाधव, राविदादा औताडे, काका शिंदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

औताडे यांनी सांगितले की परिसरातील रुग्णांना अति तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी या रुग्णवाहिकेचा माफक दरात उपयोग होणार आहे. अनेक दिवसाची संकल्पना आज सत्यात उतरली असल्याने आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब रहाणे यांनी केले तर आभार अमोल औताडे यांनी मानले.