कोपरगांव प्रतिनिधी, दि. १० : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर आंतर महाविद्यालयीन या विभागीय स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने प्रथम विजेते पद जिंकून जिल्ह्यात बेसबॉल क्रीडा प्रकारामध्ये अव्वल असल्याचे सिध्द केले. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अनेक बलस्थाने आहेत, त्यात क्रीडा हे बलस्थानही प्रबळ असल्याचे अनेकदा सिध्द झाले आहे, अशी माहिती संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले प्रथम दिवशी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांचे हस्ते जिल्हास्तरीय बेसबॉल स्पर्धांचे उद्घाटन झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ. डी. बी. क्षिरसागर, क्रीडा संचालक डी. एन. सांगळे व सर्व शारीरिक शिक्षक, विविध महाविद्यालयांमधुन आलेले क्रीडा प्रतिनिधी व खेळाडू उपस्थित होते.
या स्पर्धासाठी अहमदनगर जिल्ह्यातील आठ संघांनी हजेरी लावली. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय व के.जे.एस. महाविद्यालय यांच्यात अंतिम सामना रंगला. या अटीतटीच्या सामन्यात संजीवनीच्या संघाने प्रतिस्पर्धी संघाविरूध्द ८-६ अशा धावांनी विजय मिळवुन विजयाची मोहर उमटवली आणि जिल्ह्यात बेसबॉल खेळात अव्वल असल्याचे सिध्द केले.
संजीवनीच्या संघात अभिजीत पोपळघट, सुजय पवार, प्रणित बोरकर, विपुल वने, ओमकार सांगळे, अमोल गर्कळ, हर्षल गंगवाल, महेश जाधव, साहील शेख , वैभव सांगळे, धनेश लवांडे, अथर्व मदाने, अथर्व गर्जे, विशाल कराड, मुस्ताकिम सय्यद व अथर्व खर्डे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या सर्व खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक श्री गणेश नरोडे, शिवराज पाळणे, डॉ. परीमल कचरे, करण भांभु व अक्षय येवले यांचे मार्गदर्शन लाभले.
सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीतील विभागीय पातळीवरील अहमदनगर, नाशिक व पुणे जिल्ह्याच्या संघांची आता आंतर विभागीय सामने नाशिक येथे होणार असुन कोपरगांव येथेच विविध संघातुन चुनुकदार खेळाडू हे अहमदनगर संघासाठी निवडण्यात आले. यातही संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहा खेळाडूंची निवड झाली.
संजीवनी ग्रप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित केाल्हे यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.