१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी श्रीगणेश टॅलेंट सर्च परीक्षा

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : श्रीगणेश जुनिअर कॉलेज, कोऱ्हाळे मध्ये सध्या ईयत्ता १० वी वर्गात शिकणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थीनीसाठी श्रीगणेश टॅलेंट सर्च परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा रविवार दि. 22 जानेवारी 2023 रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत संपन्न होणार आहे.

Mypage

या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही तसेच या परीक्षेत सहभागी होणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यास व पालकास करीअर मार्गदर्शन संबधी विविध पर्याय या विषयावर तज्ञा मार्फत चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी दिली.       

Mypage

  या परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्णतः १० वीचा असून ५० प्रश्न बहुपर्यायी १०० गुणांसाठी विचारले जाणार आहे. त्यामध्ये सायन्स २५ प्रश्न, गणित १५ प्रश्न, गणित बुध्दीमत्ता १० प्रश्न अशी विभागणी केलेली आहे. परीक्षेचा कालावधी १ तास राहील. या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यासाठी रु.७०००/-, व्दितीय क्रमांकासाठी रु.५०००/-, तृतीय क्रमांकासाठी रु.३०००/- व उत्तेजनार्थ १०००/- (५ बक्षिसे) , ७००/-(२० बक्षिसे), ५००/-(२५ बक्षिसे) अशी एकूण ५३ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. वरील सर्व बक्षिसे रोख स्वरुपात देण्यात येईल. त्यामुळे इयत्ता १० वित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा. विजय शेटे यांनी केले आहे.

Mypage