कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३: हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांनी सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असताना कोणत्याही परिणामाचा विचार न करता परखड मते मांडून देशहित साधले असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक सामर्थ्यवान, दमदार, प्रभावशाली व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. सर्व पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.
ते पुढे म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्रजी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांनी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतविले. नेताजी सुभाषचंद्रजी बोस व बाळासाहेब ठाकरे हे प्रखर देशभक्त व देशहित जपणारे थोर नेते होते.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राजेंद्र सोनवणे, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरदनाना थोरात, शहराध्यक्ष दत्तात्रय काले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, भाजपचे नगरपालिकेतील माजी गटनेते रवींद्र पाठक, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब नरोडे, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, विजय आढाव, माजी नगरसेवक डॉ. अजेय गर्जे, यांच्यासह भाजप, शिवसेना, रिपाई आदी पक्षांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.