शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : भारतीय प्रजासत्ताकाचा वर्धापन दिन शेवगाव शहरासह तालुक्यात मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ठिकठीकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तहसील कार्यालयातील मुख्य सार्वत्रिक कार्यक्रमात तहसीलदार छगनराव वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक विलास पुजारी, गटविकास अधिकारी महेश डोके यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी, आजी व माजी स्वातंत्र सैनिक, विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी तसेच नागरिकांची उपस्थिती होती.
शेवगाव न्यायालयात दिवाणी न्यायाधीश संजना जागुष्टे यांच्या हस्ते, पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी महेश डोके, पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विलास पुजारी, नगरपरिषदेत मुख्याधिकारी सचिन राउत, वीज वितरण कंपनीत उप अभियंता अतुल लोहारे, एसटी आगारात आगार व्यवस्थापक वासुदेव देवराज, ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामेश्वर काटे, आयुर्वेद महाविद्यालयात प्राचार्य डॉ.बीटी शिंदे, न्यु आर्ट्स आणि सायन्स महाविद्यालयात प्राचार्य डॉ.पुरुषोत्तम कुंदे, पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य रमेश भारदे, यांच्याहस्ते शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरीश भारदे, प्राचार्य शिवदास सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत, आबासाहेब काकडे विद्यालयात प्राचार्य संजय चेमटे, काकडे शिक्षण समुहाचे मुख्यकार्यकारी अधिकारी लक्ष्मण बिटाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
जेष्ठ शिक्षक सखाराम धावटे, डॉ.गीता लांडे, डॉ.प्रिया दौंड, उपप्राचार्य रूपा खेडकर, पर्यवेक्षीका पुष्पलता गरुड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या चित्रकला, रांगोळी, मेहंदी, हस्तकला स्पर्धेतील बक्षीस विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. दहीगाव ने येथील नवजीवन विद्यालयात प्राचार्य अशोक उगलमुगले यांच्या हस्ते ,तर शहरातील उर्दू प्राथमिक शाळेत माजी सभापती अरुण पाटील लांडे यांच्या हस्ते शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शहनवाज खान, सचिव जमीर पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
तालुक्यातील आदर्श गाव अमरापूर पंचायतीच्या लोकनियुक्त महिला सरपंच आशाताई गरड यांनी गावातील वयोवृद्ध सेवा निवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सुसे (वय 90) यांचे हस्ते सेवा निवृत्त ज्येष्ठ शिक्षक तुळशीराम ढाकणे (वय 80), निवृत्त सैनिक अर्जुन पठाङे तसेच गेल्या वर्षी दिल्ली परेडमध्ये सहभागी झालेली गावची सुकन्या पायल संभाजी राऊत यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून त्यांचा सन्मान केला.