श्रीगणेश शैक्षणिक संकुलात वार्षिक स्नेहसंमेलन
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : कोऱ्हाळे येथील श्री गणेश शैक्षणिक संकुलात “श्रीगणेश कलाविष्कार व स्नेहसंमेलन रंगात आले आहे. ‘देशभक्ती’ या संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनामध्ये भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर नृत्य व नाटिका सादर केली. यावेळी प्रांताधिकारी गोविंदराव शिंदे, राहाता तालुक्याचे तहसीलदार कुंदन हिरे, श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे हे उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमीचंद लोढा, विश्वस्त कामिनी शेटे, भारत शेटे, रवींद्र चौधरी, सुरेश गमे, देविदास दळवी, महावीर शिंगवी, संदीप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मूनावत, स्वप्निल लोढा, चिराग पटेल, आकाश छाजेड, गणेश कुऱ्हाडे, प्राचार्य रियाज शेख ,प्राचार्य रामनाथ पाचोरे, प्राचार्य पंकज खडांगळे हे उपस्थित होते.
स्पर्धकांच्या भरजरी वेशभूषा, इमारतीचा मोहक प्रकाश आणि तालबद्ध नृत्य अविष्कार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. संकुलाच्या विद्यार्थ्यांनी कलेबरोबरच अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेला आहे असेच भविष्यात बरेच विद्यार्थी श्री गणेश शैक्षणिक संकुल मध्ये आपले भविष्य निर्माण करतील, असा विश्वास प्रांताधिकारी गोविंदराव शिंदे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.
तसेच संस्थेने कोविड प्रकोपानंतर शैक्षणिक व क्रीडा मध्ये उंचच उंच झेप घेतली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संकुलाने आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, असे मत तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले. यावेळी विविध क्रीडा स्पर्धा व विविध परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रियाज शेख यांनी तर प्राचार्य रामनाथ पचोरे,पंकज खंडांगळे यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला.
स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहाता ते विचारांचे संमेलन बनले,संकुलात स्नेहसंमेलन दरम्यान खवय्यांसाठी स्वादिष्ट खाद्यपदार्थाचे स्टॉल आकर्षण बनले. अनेक कुटुंबांनी आपल्या पाल्याची व चिमुकल्यांची कला बघण्यासाठी गर्दी केली. स्नेहसंमेलनात साधारण ६०० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला तसेच दोन हजार पालक वर्गाने आपल्या चिमुकल्यांच्या कलेचा आनंद अनुभवला.
प्रा.विजय शेटे अध्यक्ष श्री गणेश शिक्षण संस्था