मतदार संघाच्या विकासात रस्त्यांची भूमिका महत्वाची – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : गाव, तालुका व शहराचा विकास साधायचा असेल तर दर्जेदार रस्ते असणे अत्यंत आवश्यक असून त्याशिवाय विकास साधने शक्य नाही. रस्त्यांची सुविधा असल्यास दळणवळणाच्या अडचणी येत नाही. शेतकरी, दुध व्यवसायिक यांचे साधने वाडी वस्तीपासून गाव व शहरापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे वाडी वस्तीपासून गावा पर्यंत व गावापासून शहरापर्यंत रस्ते असल्यास बाजारपेठेला चालना मिळण्यास मदत होते व गावचा व शहराचा विकास होवू शकतो.

विस्तीर्ण परिसर असलेल्या कोकमठाणमध्ये देखील रस्त्यांचे जाळे निर्माण होणे हि काळाची गरज असून परिसरातील वाड्या वस्त्यांसह सर्वच रस्त्यांचा विकास होण्यासाठी रस्त्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे कोकमठाणसह मतदार संघात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर देत असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.

कोकमठाण येथे विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर १० लक्ष निधीतून बहुउद्देशीय सभागृह बांधणे (गो-शाळा) व मंजूर घरकुलांचा भूमिपूजन समारंभ तसेच ४० लक्ष निधीतून कोकमठाण-माळवाडी ते प्रजिमा ०८ डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन व जिकल फिटनेस रिक्रिएशन संकल्पनेवर आधारित क्रीडा साहित्याचे लोकार्पण आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप अजमेरे होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोकमठाणच्या ग्रामस्थांनी विकासाच्या बाबतीत मांडलेले प्रश्न मागील तीन वर्षात मार्गी लावले आहेत. यापुढील काळात देखील कोकमठाण व परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.कोकमठाण ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भूमिहीन असणाऱ्या नागरिकांना हक्काचे घरकुल मिळवून देण्यासाठी घेतलेली भूमिका कोतुकास्पद आहे.

कोकमठाणला अल्पसंख्यांक निधीतून आजपर्यंत २० लक्ष रुपये निधी दिला आहे. कब्रस्थानच्या संरक्षक कम्पाउंडचे काम प्रगतीपथावर आहे. विकास कामांसाठी भविष्यात अजूनही निधीची गरज भासल्यास निधी देवू. कोपरगाव शहरातील विविध समाज बांधवांच्या समाज मंदिरासाठी वैशिष्ठ्यपूर्ण निधीतून दिलेल्या प्रत्येकी १० लक्ष निधीतून विविध समाज मंदिरांची कामे प्रगतीपथावर आहेत.

मागील तीन वर्षात झालेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहन केले. कोकमठाण व परिसराचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लक्ष्मी माता मंदिरास ‘क’ वर्ग दर्जा मिळवून दिला आहे. या देवस्थानच्या विकासासाठी ५० लक्ष निधी मंजूर असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील २० लक्ष रुपये निधी दिला असल्याचे त्यांनी सागितले.  

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर करखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, सुरेश जाधव, दिलीप अजमेरे, कैलास ठोळे, अतुल काले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, सरपंच सौ. उषाताई दुशिंग, उपसरपंच अरविंद रक्ताटे, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे संचालक सुदाम लोंढे, विजय रक्ताटे, विजयराव पंढरीनाथ रक्ताटे, विजय थोरात, दादासाहेब साबळे, प्रकाश देशमुख, सुनील कुहिले, शंकर वाघ, सोपान काशीद, गोरक्षनाथ लोहकणे, प्रभाकर धिवर, जॉनी धिवर, दिपक रोहोम, श्याम लोहकणे, दत्तात्रय टिळेकर, प्रविण पाटणी, आनंद दगडे, आनंद पहाडे, अमित जैन, शैलेश ठोळे, अमोल काले, दिनकर रोहोम, अजित रक्ताटे संदीप लोहकणे, अनंत रक्ताटे, विशाल जाधव, 

सोमाजी महाजन, ज्ञानेश्वर रक्ताटे, संतोष लोंढे, संजय थोरात, सुभाष लोंढे, विशाल शितोळे, आप्पासाहेब लोहकणे, मच्छिन्द्र देशमुख, बाळासाहेब थोरात, भाऊसाहेब फटांगरे, दिलावर सय्यद, सदाशिव रक्ताटे, शरद फटांगरे, अल्लाउद्दीन सय्यद, अविनाश निकम, पंकज लोंढे, किरण धिवर, शाहबाज सय्यद, संभाजी देशमुख, दिपक कराळे, श्रीकांत गायकवाड, सलीम सय्यद, अखिलेश भाकरे, प्रभाकर भाकरे, पंचायत समिती बांधकाम विभागाचे चांगदेव लाटे, गणेश गुंजाळ, ग्रामसेवक संग्राम बोर्डे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे गो-शाळा स्थापन झाल्यापासून आजपर्यंत गो-शाळेला निधी मिळालेला नाही. मात्र जैन समाजाच्या मागणीला तातडीने होकार देत कोकमठाण गो-शाळेच्या सभागृहासाठी आ. आशुतोष काळे यांनी १० लक्ष निधी दिला आहे. व आज पुन्हा गो-शाळेला एक लक्ष रुपये मदत देण्याचे जाहीर केले. त्यामुळे जैन समाज व गो-प्रेमी आ. आशुतोष काळे यांचे सदैव ऋणी राहणार असून गो-शाळा स्थापन झाल्यापासून गो-शाळेला निधी देणारे आ. आशुतोष काळे पहिलेच आमदार आहेत. – आनंद दगडे (गोकुळ धाम-अध्यक्ष)