धर्माधिकारी प्रतिष्ठानने राबविली कोपरगावात स्वच्छता मोहीम 

६ टन कचऱ्याची लावली विल्हेवाट 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १ : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान( रेवदंडा, तालुका अलिबाग,जिल्हा रायगड) यांचे वतीने महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दी वर्ष निमित्ताने स्वच्छ भारत अभियान’ राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत व प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथील विविध शासकीय कार्यालय, ग्रामीण रुग्णालय परिसर व शहरातील प्रमुख रस्ते यांची एक मार्च रोजी सकाळी सात ते साडे दहा वाजे दरम्यान स्वच्छता अभियान राबवून सुमारे सहा टन सुका आणि ओला कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन यादव, तालुका पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. दिलीप दहे, पर्यवेक्षक जगदीश कुमार कदम, कोपरगाव बस आगार प्रमुख अमोल बनकर, डाक निरीक्षक अनंत सोनवणे, माजी नगरसेवक जनार्दन कदम आदींच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामीण रुग्णालय, तालुका पशुवैद्यकीय दवाखाना, पोस्ट कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, तसेच संभाजी महाराज पुतळा ते बस स्थानक ते साईबाबा कॉर्नर, सुभद्रानगर रस्ता ते गणेश कोचिंग क्लासेस आदीं ठिकाणी बुधवार दि. १ मार्च रोजी सकाळी सात वाजता स्वच्छता अभियानात सुरुवात करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ संभाजी चौक येथे करण्यात आला.

या स्वच्छता अभियान मोहीम मधे कोपरगाव येथील बैठकीचे ११६ सदस्य, साकुरी  बैठकीतील २७ सदस्य व अन्य नऊ कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. या अभियानात नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री गोसावी यांनी एक डंपर एक ट्रॅक्टर व तीन घंटागाड्या कचरा उचलण्यासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. या अभियानात पाच हजार ७२५ क्विंटल कचरा संकलन करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.