आपल्यातील हुन्नर ओळखून मार्गक्रमण करा, यश मिळाल्याशिवाय रहाणार नाही- बाबासाहेब सौदागर

शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : आयुष्यात थकून जाऊ नका, मागे फिरू नका. परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला एकतरी जमेची बाजू दिलेली असते. ती पारखून काय करायचं ती दिशा ठरवून चालत रहा यश आपोआप आपल्या कवेत आल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन गदिमा पुरस्कार सन्मानीत प्रसिद्ध सिने गितकार बाबासाहेब सौदागर यांनी केले.

       येथील  न्यू आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात आज वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहात पार पडला. सिने-गीतकार, लेखक, कवी , पटकथाकार विविध साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष अशा ‘ बहुरंगी व्यक्तिमत्व लाभलेल्या  बाबासाहेब सौदागर याचे हस्ते पारितोषिक वितरण झाले, यावेळी ते बोलत होते.

    प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.  बाबासाहेब सौदागर यांनी “माझ्या गाण्याची जन्मकथा” या विषयावर आपल्या ओघवत्या शैलीत त्यांचा गीतकार व कवी होण्याचा जीवनपट उलगडून सांगितला. व्याख्याना दरम्यान त्यांचा हा प्रवास अभंगापासून लावणी, प्रेमगीत, गोंधळ, देशभक्ती पर गिते, जी विविध चित्रपटात गायली गेली आणि गाजली ती संबधित चित्रपटातील शॉट प्रक्षेपित करून वेगळ्या ढंगात सादर केली.

       महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी स्वागत केले. स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग ठोंबरे यांनी अहवाल वाचन केले. अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सदस्य, कार्यकारी मंडळ अॅड. वसंतराव कापरे हे होते.      

संस्थेचे जेष्ठ विश्वस्थ डॉ. चंद्रकांत मोरे व संस्थेच्या सदस्या निर्मलाताई काटे, कविता सौदागर, माजी प्राचार्य शिवाजी  देवढे, मंचावर होते. उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके, डॉ. रवींद्र वैद्य, डॉ. गोकुळ मुंढे, प्रा. अपर्णा वाघ, प्रा. मफीज इनामदार, डॉ. छाया भालशंकर  प्रा. मिनाक्षी चक्रे, प्रा. मोहन वेताळ, प्रा. रमेश चेडे’ पालक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  डॉ. गोकुळ क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विठ्ठलराव देवढे आणि डॉ. अनिता आढाव यांनी सुत्रसंचलन केले तर डॉ. शिवराम कोरडे यांनी आभार मानले.