संवत्सर रामवाडी येथे बिबट्याने शेळी फाडली

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : तालुकयातील संवत्सर रामवाडी येथील हरिभाऊ चौतमल यांची पत्नी सुभाष कोद्रे यांच्या उसाच्या शेतात शेळ्या चारीत असताना उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळीवर झडप घालून  तिचा फडशा पडला, शेळीची मान धरून उसाच्या शेतात ओढीत नेले केल्याने चौतमलबाई घाबरून जागेवर बेशुद्ध झाल्या

Mypage

घटनेची माहिती समजतात बिबट्याला पळवण्यासाठी फटाके फोडण्यात आले. यावेळी उपसरपंच विवेक परजने यांनी फोन केल्यानंतर फाडलेल्या शेळीचा पंचनामा वनपाल संजय साखरे, डॉ. दहे, अशोक घोरपडे हरिभाऊ चौतमल यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला.

tml> Mypage

सध्या संवत्सर  परिसरात बिबट्याचाही व रानडुकराचा संचार वाढल्याने शेतकऱ्यांना  रात्रीच्या वेळी पाणी भरणे, शेतात जाणे अवघड झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या मोठा असल्याने  शक्यतो घराबाहेर पडण्याचे धाडस शेतकरी करीत नाहीत. लोकांना भीतिमुक्त करण्यासाठी सरपंच सुलोचनाताई ढेपले ग्रामपंचायत मधून वनविभागाला पत्र देऊन पिंजरा लावण्याची मागणी साठी प्रयत्नशील आहे. तरीही परिसरातील नागरिकांनी सावध राहून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Mypage