कोपरगाव तालुक्यातील बड्या गुटखाकिंगवर पोलीसाची कारवाई

Mypage

गुटखा किंग पोलीसांना गुंगारा देवुन पसार

Mypage

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : संपूर्ण कोपरगाव तालुक्यातील गुटखा विक्रेत्यांना गुटखा पुरवणारा तालुक्यातील कोळपेवाडी येथील रितेश गादीया हा गुटखा किंग गेल्या अनेक वर्षांपासून पोलीसांच्या आशीर्वादाने गुटखा विक्री करत आहे. माञ रविवारी राञी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक धाड टाकुनी रितेश सुभाष गादीया याला मुद्देमालासह  पकडले माञ पोलिसांची चाहुल लागताच गुटखा माफिया रितेश गादीया आपल्या ताब्यातील गुटख्याची गाडी सोडून पसार झाला. 

Mypage

  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गादीया यांच्या ताब्यातील मालवाहतुक गाडीची झाडाझडती घेतली असता त्यात विविध कंपन्यांच्या गुटख्याचे पुढे आढळून आले. १ लाख ११ हजार ५४० रुपयांचा गुटखा व ५ लाखांची मालवाहतुक गाडी एम‌ एच. १५ एच‌एच. ४००१ हिच्यासह तब्बल ६ लाख ११ हजार ५४० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. 

Mypage

 अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी शिवाजी अमोल ढाकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रितेश सुभाष गादीया यांच्या विरोधात कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Mypage

 दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पावने आठ च्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन तालुक्यातील सुरेगाव शिवारातील पोल्ट्री फार्म जवळ  एम.एच. १५ एच.एच. ४००१ क्रमांकाची मालवाहतुक गाडीतुन विविध कंपन्यांचा गुटखा घेवुन जात असताना आढळुन आला.

Mypage

यावेळी पोलीसांना खआञई पटताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस बाळासाहेब मुळीक, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सचिन आडबल, आकाश काळे, रणजीत जाधव यांनी रितेश गादीया याला गाडीसह पकडण्याचा प्रयत्न केला. माञ रितेश गादीया हा पोलीसांना चकवा देवुन पळवुन जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी गुटख्यासह इतर मुद्देमाल ताब्यात घेतला असुन राञी उशिरा पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम. ए. कुसारे हे करीत आहेत.

Mypage

 गुटखा किंग रितेश गादीया यांने  पोलीस आपल्या पर्यंत येण्या अगोदरच  न्यायालयात धाव घेवुन स्थानिक पोलिसांना  कोणतीही खबर लागायच्या आतच  न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरु करुन स्थानिक पोलिसांना अजब धक्का दिला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *