यमुना भापकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड

Mypage


शेवगाव प्रतिनिधी, दि. ०५ : सालवडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी यमुना काकासाहेब भापकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदासाठी सरपंच अण्णासाहेब रुईकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Mypage

या ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदी पाळी पद्धतीने (रोटेशन) सदस्याची निवड करण्याचा प्रघात असल्याने उपसरपच राजेद्र औटी यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने, रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.

Mypage

उपसरपंचपदासाठी यमुना काकासाहेब भापकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र औटी, अरुण निक्ते, सुनिता गोरक्षनाथ औटी, भारत लांडे, सविता कानिफनाथ भापकर सदस्य उपस्थितीत होते.

Mypage

ग्रामसेवक अशोक नवले यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. भापकर यांची बिनविरोध निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून जल्लोष करुन त्यांचे अभिनंदन केले.

Mypage

यावेळी विकास सोसायटीचे व्हा.चेअरमन, काशिनाथ रुईकर, प्रकाश भापकर, अनिल भापकर, धनंजय टेकाळे, कानिफ भापकर, अशोक लांडे, काकासाहेब लांडे, श्रीकांत औटी, मारुती औटी, शेखर गोरे, अलका भापकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Mypage