कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०७ : कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी मतदार संघातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला आहे.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के यांच्या वतीने कोपरगाव शहरातील पद्मा मेहता प्राथमिक कन्या विद्या मंदिरातील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात होते. यावेळी माजी नगरसेविका प्रतिभा शिलेदार, स्वप्नजा वाबळे, श्रीमती वर्षा गंगुले, लतिका म्हस्के, मनीषा म्हस्के, माया खरे, शीतल लोंढे, भाग्यश्री बोरुडे, शीतल वायखिंडे, सुषमा पांडे, रेखा जगताप, कविता जिरे, पुनम पाटोळे, आशा भिंगळे यांच्या हस्ते या सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले.
धामोरी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर कुलकर्णी, पुंडलिकराव माळी माधवराव खिलारी, सुनील मांजरे, मनोज जगझाप, रामराव जगझाप, ज्ञानदेव मांजरे, शामराव माळी, अरुण भाकरे, राजेंद्र वाईकर, माणिक समोसे, प्रशांत कदम, नारायण माळवदे तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. सोनारी येथे विनोद सांगळे, वसंत सांगळे, मोहन सोनवणे, बाळासाहेब केकान, भाऊसाहेब सांगळे, अमोल केकान, तुकाराम घुगे, अरुण आव्हाड यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले.
कोपरगाव मतदार संघातील राहाता तालुक्यातील खंडोंबाची वाकडी येथील दत्तात्रय कोते यांच्या वतीने वाकडी गावातील पांढरी वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना शालेय शिक्षण साहित्य वाटत करण्यात आले. यावेळी आण्णासाहेब कोते,दत्तात्रय कोते, आण्णासाहेब कोते, जालिंदर कोते, भाऊसाहेब लहारे, मछिद्र दळे, किसन कोते, निलेश कोते, प्रफुल्ल शेळके, भाऊसाहेब कोते, किरण कोते, किशोर कोते, आदी उपस्थित होते. जेऊर कुंभारी जिल्हा परिषद गावठाण शाळेतील विद्यार्थ्यांना आमदार आशुतोष काळे मित्र मंडळाचा वतीने शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी गौतम बँकेचे संचालक बापुराव वक्ते, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कार्यकारी संचालक दिलीपराव शिंदे, पाटीलबा वक्ते, कल्याण गुरसळ, महेंद्र वक्ते, भानुदास वक्ते, किरण पाटीलबा वक्ते, शिवाजी मच्छिंद्र वक्ते, शिवाजी वक्ते, ग्रामपंचायत सदस्य किशोर वक्ते, अनिता गायकवाड, धनश्री वक्ते, नानासाहेब गुरसळ,दत्तु बारसे, जगन्नाथ लिंभूरे, गणेश लिंभूरे, प्रितम गायकवाड, नितीन गायकवाड, गणेश परसया, भय्या गुरसळ, सागर गुरसळ, आकाश लिंभूरे, मनोज लिंभूरे, सचिन लिंभूरे, मुख्याध्यापक रमेश गुरसळ आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जि.प. प्राथमिक शाळा शिरसगाव येथील नितिन चौधरी यांनी वह्या वाटप केल्या. याप्रसंगी उपसरपंच इरफान पटेल, प्रविण चौधरी, राहुल गायकवाड, साईनाथ चौधरी,सुलतान पटेल, अमोल गायकवाड, सलिम पटेल गोपीनाथ भागवत, संदिप भागवत, गुलाब पटेल, मुख्याध्यापक संभाजी लामघे तसेच शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकरी, कष्टकरी, गोर गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षण प्रसाराचा रथ, कर्मवीर शंकरराव काळे यांनी अखंडपणे मार्गस्थ ठेवून खेड्यापाड्यात शिक्षणाची मंदिरे उभी केली. त्यामुळे शिक्षणाबद्दल काळे परिवाराला अत्यंत जिव्हाळा असून कार्यकर्त्यांनी देखील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देवून स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
ग्रामीण भागात बिकट परिस्थितीत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शालेय दप्तर व इतर शैक्षणिक साहित्य तुटपुंजा कमाईत आपल्या पाल्यांना देणे अशक्यप्राय असते. हे विद्यार्थ शैक्षणिक गरजांपासून वंचित राहू नये. यासाठी कार्यकर्त्यांनी राबविलेले उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.