कोपरगाव पिपल्स बँक ‘बँको ब्लू रिबन’ पुरस्काराने सन्मानीत

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ : बँकेने सन २०२२-२३ मध्ये उल्लेखनिय प्रगती केल्याने बँकेला बँकींग क्षेत्रातील प्रतिष्ठेचा असलेला “BANCO BLUE RIBBON AWARD-2023” या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सदर अवार्ड रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाचे पुर्व चिफ जनरल मॅनेजर मा. श्री. पी. के. अरोरा साहेब यांचे शुभ हस्ते देण्यात आला व सदरचा अवार्ड बँकेचे चेअरमन कैलासचंद ठोळे, व्हा. चेअरमन भाऊसाहेब लोहकरे व संचालक कल्पेश शहा, अतुल काले, राजेंद्र शिंगी, सत्येन मुंदडा, सुनिल बंब, सुनिल बोरा, हेमंत बोरावके यांनी स्विकारला.

Mypage

बँकेचे चेअरमन कैलासचंद ठोळे यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून बँकेची दि.३१.०३.२०२३ अखेरची आकडेवारी भागभांडवल रू. ६ कोटी ५७ लाख, निधी ४० कोटी ४१ लाख, ठेवी २७५ कोटी ६० लाख, गुंतवणुक १४४ कोटी ४ लाख, कर्जे १६१ कोटी ९ लाख व सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा २ कोटी ३७ लाख इतका झालेला असून बँकेला ऑडीट वर्ग “अ” प्राप्त झालेला आहे.

Mypage

बँकेचा सी.आर.ए.आर हा १९.८४% इतका आहे. तसेच सी. आर. आर. व एस.एल.आर. मध्ये एकदाही उल्लंघन झालेले नाही या सर्व बाबींचा विचार करून बँकेला सहकारातील नामांकीत असा “BANCO BLUE RIBBON AWARD-2023” हा पुरस्कार भेटला. सदर अवार्ड हा बँकेच्या नावलौकीकांत भर घालणारा आहे. सदर अवार्ड हा बँकेचे सर्व संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार व कर्मचारी वर्ग यांनी वेळोवेळी घेतलेल्या कष्टामुळे व यांच्या अनमोल सहकार्यामुळे प्राप्त झालेला असुन या मध्ये सर्वाचा मोलाचा वाटा आहे असे त्यांनी सांगितले.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *