खुनाच्या गुन्हयातील ९ आरोपींना जन्मठेप

कोपरगाव प्रतिनिधी दि. ३१ : लोणी पोलिस स्टेशन हद्दीतील लोहगाव ता. राहाता येथे शेतीच्या वादातून एकाचा खुन झाला होता. त्यातील नऊ आरोपींना कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने न्यायालय परिसरात याच गुन्ह्याची चर्चा होती.

सविस्तर माहिती अशी की, दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी आरोपी व मयत गौरव कडु यांचे मध्ये शेतीवरून वाद झाले होते. यातील आरोपी अमोल नेहे, किशोर नेहे, वसंत नेहे, सुरेश नेहे, सचिन नेहे, प्रसाद नेहे, आकाश नेहे, मयूर नेहे व जगन्नाथ पांडगळे यांनी मयत गौरव अनिल कडू याचे डोक्यात कुदळ मारून व लोखंडी रॉडने मारहाण करून मयत गौरव कडू यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने जबर मारहान केली होती.

 या मारहानीमुळे गौरव कडू गंभीर जखमी झाला होता. झालेल्या जखमामुळे मयत गौरव अनिल कडू याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यावरून आरोपी विरूध्द लोणी पोलीस स्टेशन मध्ये गुरु नं १/२०२१ नुुसार भा.द.वि. कलम ३०२, ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोदविण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास पूर्ण होउन कोपरगाव येथील अतिरीक्त सत्र न्यायालयात वरील नऊ आरोपी विरुद्ध दोषारोप दाखल झाले होते. सदर खटल्यामध्ये सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता शरद गुजर यांनी काम पाहीले. सदर प्रकरणात एकूण अकरा महत्वाचे साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, स्पॉट पंच, जप्ती पंच, पी. एम. रिपोर्ट, तपासी अधिकारी यांचे जबाब नोंदविण्यात आले असून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार याची साक्ष महत्वाची ठरली.

सरकारी वकीलांनी त्यांचे युक्तिवादात सर्व मुद्दे न्यायालयापुढे सिध्द केले. सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राहय धरून कोपरगाव येथील मा. अतिरीक्त सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील साहेब यांनी सर्व नऊ आरोपींना भा.द.वि. कलम ३०२, ३०७, १४८, १४९, अन्वये दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच एक लाख ऐंशी हजारांचा आर्थिक दंड सुनावला असुन त्या दंडाच्या रकमेपैकी एक लाख पंन्नास हजार रुपये मयताच्या कुटुंबास नूकसानभरपाई म्हणुन देण्याचे आदेश या न्यायलयाने दिले आहेत. सदर प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून लोणी पोलिस स्टेशनचे ए.एस.आय. नारायण एस. माळी यांनी कामकाजात सहकार्य केले.

सदर न्याय निर्णय जाहीर होताच सर्व आरोपिंना ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी तुरुंगात केली असल्याने अरोपिंची दिवाळी तुरुंगातच होणार की काय? अशी चर्चा नागरिक, वाकीलांमध्ये सुरु होती. या निर्णयामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.