कोपरगाव विकासासाठी दिलेल्या निधीतील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. परंतु या निधीतील अनेक विकास कामे प्रलंबित असून हि कामे तातडीने सुरु करा. अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील प्रलंबित असलेल्या विविध विकास कामांकडे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचे लक्ष वेधून त्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात नागरिकांना स्वच्छ पाणी द्यावे, शहरातील कचऱ्याचे ढीग हटवावे व स्वच्छता करून रोगप्रतिबंधक फवारणी करावी, गांधीनगर ते दत्तनगर रस्त्याचे काँक्रीटीकरण करावे. कब्रस्तान येथील खोल्यांचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करावे. बल्लाळेश्वर ते राज टी हाऊस ते जहिर अत्तार घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसवावे.

हनुमाननगर कब्रस्तान येथील अर्धवट राहिलेला रस्ता, गांधीनगर येथील सतोटे किराणा दुकानासमोरील रोड क्रॉस नाला, गांधीनगर येथील शौचालय परिसरातील अर्धवट बसवलेले पेव्हिंग ब्लॉक, मार्के घर ते अंबिका माता मंदिर येथील अर्धवट झालेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, नवीन कब्रस्तान समोरील अर्धवट झालेले रस्ता काँक्रीटीकरण ही अर्धवट झालेली कामे तातडीने पूर्ण करावी. गवारेनगर तारांगण शॉप ते सिनगर घर ते साई यमुना बिल्डिंग ते रॉयल ड्रीम सिटी रस्ता, गवारेनगर नाज चिकन शॉप ते कटोळे घर रस्ता, द्वारकानगरी काकासाहेब कोयटे घर ते लोहारकर सर घर रस्ता, व्यापारी धर्मशाळा समोरील अमरधामकडे जाणारा रस्ता, 

मोहिनीराजनगर मधील प्रमुख रस्ता, बँक रोड ते टिळकनगर येथील प्रमुख रस्ता, ईदगाह मैदान ते भालेराव कॉम्प्लेक्स रस्ता, प्रभाग ५ मधील वडांगळे वस्ती रस्ता व अंतर्गत रस्ते, प्रभाग ९ मधील पेव्हिंग ब्लॉक व रस्ते ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सबंधित ठेकेदारांना द्याव्यात. ज्या ठेकेदाराकडून वेळेत काम पूर्ण होणार नाही अशा ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकून त्या ठेकेदारास सदर कामाचे पेमेंट अदा करू नये. अन्यथा नगरपरिषद प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, सोशल मीडिया सेल प्रदेश सरचिटणीस अशोक आव्हाटे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरवके, वर्षा गंगूले, हाजी मेहमूद सय्यद, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष निखील डांगे, डॉ. तुषार गलांडे, प्रकाश दुशिंग, मनोज कडू, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र खैरनार, मुकुंद इंगळे, धनंजय कहार, संदीप कपिले, एकनाथ गंगूले, शैलेश साबळे, सचिन गवारे, चांद पठाण, निलेश डांगे, विशाल निकम, योगेश वाणी, रोहित खडांगळे, राकेश शहा, तेजस गंगूले, सागर लकारे, मोसीन सय्यद, अमोल आढाव, रिंकेश खडांगळे, संदीप दळवी, शंकर घोडेराव, विकास बेंद्रे, नितीन साबळे, युसुफ पठाण, आसिफ शेख, रिजवान सय्यद, भुरा सय्यद, शकील सय्यद, पप्पू सय्यद, अरबाज सय्यद आदी उपस्थित होते.