रामकिसन तुजारे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड

शेवगाव प्रतिनिधी, दि.१५ : तालुक्यातील बोडखे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच पुंजाराम लक्ष्मण बर्डे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर रामकिसन दौलत तुजारे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यांत आली.

सरपंच अनिता बंडू बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाच्या निवडीसाठी बोलाविलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत उपसरपंच पदासाठी रामकिसन दौलत तुजारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक इंगळे यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्या ज्योती बाळकृष्ण बर्डे, पुंजाराम बर्डे, आदिनाथ वेताळ, संगिता साईनाथ धावणे उपस्थित होते. आयोध्या शंकर बर्डे या अनुपस्थित होत्या. बिनविरोध निवडीसाठी आदिनाथ वेताळ, डॉ कल्याण बर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले.