शेवगाव प्रतिनिधी, दि.१९ : गावाच्या विज, पाणी, रस्ते या सर्व समस्या सुटल्या असून गावातील मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषद मराठी शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. एकंदरीत रांझणी या छोट्याशा गावचे मार्गक्रमण लोकनियुक्त सरपंच प्रा.काकासाहेब घुले यांचे मार्गदर्शना खाली आदर्श गावाच्या दिशेने चालु असल्याचे मत माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले यांनी व्यक्त केले आहे.
तालुक्यातील रांजणी येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीची लोकनेते मारुत घुले ग्रामसचिवालय नामकरण व लोकार्पण सोहळा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच वर्ग खोल्यांचे लोकार्पण, डिजिटल क्लासरूम तसेच उडान महिला ग्राम संघ या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मा आ.डॉक्टर नरेंद्र घुले व ह. भ. प. अशोक महाराज बोरुडे, कुलट महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी घुले बोलत होते.
गावातील चोहूबाजूचे रस्ते, मंदिर, पर्यावरण रक्षणार्थ वृक्षारोपण, पिण्याच्या पाण्याची सुविधा या सर्व बाबी प्राधान्याने हाती घेतल्या आहेत. काही कामे पुर्णत्वाच्या मार्गावर आहेत. यावेळी चेअरमन मिलिंद कुलकर्णी माजी सभापती त्रंबक जाधव, ग्रामपंचायत सरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे, आबासाहेब काळे, बाबासाहेब आगळे, ज्ञानेश्वरचे संचालक विष्णुपंत जगदाळे, ज्ञानेश्वर कारखाना फळे भाजीपाला चेअरमन भाऊसाहेब आगळे, रा. युवक काँ. ता उपाध्यक्ष निलेश कुंभकर्ण, विलास लोखंडे, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी भारत खाटीक, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच प्रा.काकासाहेब घुले यांनी प्रास्ताविक केले. अरुण थोरात यांनी आभार मानले.