श्रीपतराव गवळी सोसायटीच्या संचालकपदी गवळी व आभाळे यांची बिनविरोध निवड 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : तालुक्यातील मढी खुर्द येथील श्रीपत तात्याबा गवळी सहकारी सोसायटीच्या दोन रिक्त जागेवर बबन श्रीपत गवळी व गोपिनाथ रूंजा आभाळे यांची गुरूवारी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून कोपरगाव सहायक निबंधक कार्यालयाचे ए. ई. शेख यांनी काम पाहिले. या नवनिर्वाचित संचालकांचा सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यांत आला.

सत्कारास उत्तर देतांना बबन श्रीपत गवळी व गोपिनाथ आभाळे म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सभासद विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करत सभासद शेतकऱ्यांचा विकास करू ही निवड बिनविरोध करण्यांत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक व संस्थेचे अध्यक्ष रमेश आभाळे, उपाध्यक्षा सिंधु साहेबराव गवळी, शिवाजी गवळी, रामभाऊ आभाळे, दत्तात्रय गवळी, राजेंद्र गवळी, बापूसाहेब गवळी यांच्यासह सर्व संचालकांनी विशेष सहकार्य केले.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी नवनिर्वाचित संचालकांचे विशेष अभिनंदन केले आहे. सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव संदिप चौधरी यांनी काम पाहिले व आभार मानले.