निवासी शिबिरातून समाजाशी एकरूप होण्याची शिकवण – चैताली काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०५ :- आयुष्यातील आपले इच्छित ध्येय गाठण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून समाज व देशाप्रती आपल्या जबाबदारीची जाणीव होत असून समाजाशी एकरूप कसे व्हायचे याची शिकवण मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीला काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील मढी खु. येथे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब कुऱ्हाडे होते.

याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या की, राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होवून विद्यार्थ्यांमध्ये नियोजनात्मक कला विकसित होते. निवासी शिबिरातून सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात. त्यांना समाजासोबत मिळून मिसळून राहायची व श्रम संस्कारातून समाजाशी एकरूप होण्याची शिकवण मिळते व या समाजसेवेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रम प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत आभाळे, एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सुनील बोरा, मोहन आभाळे, श्रीधर आभाळे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा वैशाली आभाळे, उपसरपंच लिना आभाळे, बीपीन गवळी, रविंद्र आभाळे, गायत्री गवळी, मनीषा आभाळे, भीमाजी माळी, सुखदेव भागवत, आबासाहेब आभाळे, प्रमोद आभाळे, किरण आभाळे, अशोक आभाळे, भरत आभाळे, आनंदा गवळी, 

सुधाकर कुऱ्हाडे, पुंजाजी गवळी, पोपट दुशिंग, सुभाष माळी, शिवाजी आभाळे, शंकर आभाळे, रुपाली आभाळे, अंजली आभाळे, अनिता आभाळे, रोहन आभाळे, धनंजय आभाळे, तेजस भागवत, आशुतोष आभाळे, प्रतीक आभाळे, सुमित आभाळे, नारायण आभाळे, ग्रामसेवक किरण राठोड, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्तविक प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सागर मोरे यांनी केले तर कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष जाधव यांनी मानले.