स्थापत्य अभियंतापदी निवड झालेल्या स्वाती होनचा आमदार काळेंच्या हस्ते सत्कार

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील चांदेकसारे येथील सर्वसामान्य कुटुंबातील स्वाती नामदेव होन यांनी एम.पी.एस.सी.मधून घेण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत उत्तीर्ण होवून त्यांची सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट पदी निवड झाली आहे. त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी स्वाती होनचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Mypage

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावची रहिवासी असलेल्या स्वाती होन हिचे माध्यमिक शिक्षण सुरेगाव-गौतमनगर येथील राधाबाई काळे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात झाले. एस.एस.जी.एम. महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेवून पुढे इंजिनिअरिंग मधून सिव्हिल इंजिनिअर पदवी मिळविणाऱ्या स्वातीला शिक्षणाची आणि अभ्यासाची उपजतच आवड असल्यामुळे तिला अनेक खाजगी कंपनीत चालून आलेल्या नोकरीच्या संधी नाकारत स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासावर भर देवून त्यांनी आपले ध्येय साध्य केले आहे.

tml> Mypage

कु. स्वाती होन हिने मिळविलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून आ. आशुतोष काळे यांनी देखील त्यांचा कोपरगाव तहसील कार्यालयात सत्कार केला. मनात निश्चित केलेले ध्येय गाठायचे असेल तर परिस्थिती तुम्हाला रोखू शकत नाही हे स्वाती होन यांनी दाखवून दिले असल्याचे गौरवद्गार आ. आशुतोष काळे यांनी काढले असून स्वाती होन यांना खंबीर साथ देणाऱ्या तिच्या कुटुंबाचे देखील त्यांनी अभिनंदन केले आहे.

Mypage