मैत्र जिवांचे एक दीपस्तंभ – अनुराधा केदार

शेवगाव प्रतिनिधी, दि.०९ :  दृष्टीहीन दिव्यांग यांच्या जिवनात आनंद निर्माण करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे सुनील चोरडिया यांनी ‘मैत्र जिवांचे ग्रुप’ च्या वतीने हाती घेतलेलं कार्य एक दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त अनुराधा केदार यांनी केले.

स्वतः जन्मतःच अंध असल्याने अंध व दिव्यांगांच्या दुःखाची जाणीव असलेले सुनील चोरडिया यांच्या जन्मगावी तालुक्यातील श्री क्षेत्र अमरापूर येथे निकिता बोरुडे या दिव्यांग बालिकेस व्हीलचेअर चे वाटप गावच्या सरपंच आशा गरड यांचे हस्ते करण्यात आले.

या वेळी संतोष चोरडिया युवा कीर्तनकार भागीरथीबाबा, माजी सरपंच बापू बोरुडे, सुखदेव कराळे, अकबर पठाण, अर्जुन पठाडे, मच्छिंद्र सुसे संदिप भुजभळ, अशोक चौधर उपस्थित होते.

‘मैत्र जिवांचे ग्रुप’ च्या माध्यमातून पुणे शहरामध्ये समाजातील अनेक निराधार निराश्रित अंध अन दिव्यांगांना आश्रय देवून उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध करुन देत त्यांना सन्मानपूर्वक जगण्याचं बळ देत आहेत. 

आपलं संपूर्ण आयुष्य अशा सत्कार्यात व्यतीत करतांना आपल्या घासातला घास दीन दुबळ्यांना देण्याचा स्तुत्य उपक्रम सुनील चोरडिया गेली अनेक वर्षे राबवित आहेत. या कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांना सम्मानित करण्यात आले आहे.