शेवगावातून चार धारदार तलवारी जप्त, दोन आरोपी ताब्यात

शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : शनिवारी सायंकाळ ते रविवार दि.10 पहाटे ५ वा. चे दरम्यान पोस्टे हद्दीत कोम्बींग ऑपरेशन राबवुन अवैध धंद्यावर कारवाई, अग्निशस्त्रे व हत्यारे याबाबत मोहीम राबवावी याबाबत पोलीस अधिक्षक राकेश ओला यांचे आदेश दिल्यावरून शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी दोन पोलीस पथके करून ही मोहिम राबविली असता शेवगावातील विशाल संपत भाकरे वय-२३ वर्षे, व संतोष अशोक घोंगडे वय-२५ वर्ष दोघे रा. कोरडेवस्ती  यांना पोलीस पथकाने ताब्यात घेवुन त्यांच्या कडून घरामध्ये लपवून ठेवलेल्या चार तलवारी पोलीस स्टाफ व पंचासमक्ष  काढुन दिल्या.  

पोलीस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि. नं.-२०६/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, पोसई अमोल पवार, पोहेकॉ परशुराम नाकाडे, पोहेकॉ सुधाकर दराडे, पोना उमेश गायकवाड, पोकों बप्पासाहेब धाकतोडे, पोकों एकनाथ गर्कळ, पोकों कृष्णा मोरे, पो कॉ संतोष वाघ, पोकों संपत खेडकर यांनी केली असून पुढील तपास पोहेकाँ दराडे करत आहेत.